शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोर्शी आगारावर शेकडोंचा जमाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 21:58 IST

प्रवीण वैराळे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नीला नोकरी व ३० लाख रुपयांची मदत देण्याच्या मागणीसाठी सुमारे ३०० च्या संख्येने हिवरखेडवासी मोर्शी आगारात बुधवारी धडकले. त्यांनी आगार व्यवस्थापकाच्या कक्षात ठिय्या दिला. मागण्या मान्य होत नसल्यास मृतदेह येथे आणण्याचा इशारादेखील त्यांनी दिला. विभाग नियंत्रकांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देप्रवीण वैराळेंच्या कुटुंबात नोकरी : ३० लाखांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : प्रवीण वैराळे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नीला नोकरी व ३० लाख रुपयांची मदत देण्याच्या मागणीसाठी सुमारे ३०० च्या संख्येने हिवरखेडवासी मोर्शी आगारात बुधवारी धडकले. त्यांनी आगार व्यवस्थापकाच्या कक्षात ठिय्या दिला. मागण्या मान्य होत नसल्यास मृतदेह येथे आणण्याचा इशारादेखील त्यांनी दिला. विभाग नियंत्रकांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.मोर्शी आगारात मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वर्कशॉपमधील अनियंत्रित एसटीने वाहक प्रवीण वैराळे (३०) यांना चिरडले, तर वाहतूक निरीक्षक भास्कर महल्ले (५०) गंभीर जखमी झाले. प्रवीण वैराळे यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी ते ड्युटीची नोटशीट बघत होते. अनियंत्रित झालेली नादुरुस्त एसटी वर्क शॉपमधील तुलशीदास डाहे यांनी ट्रायलसाठी बाहेर काढली होती. प्रशासनाचा बेजबाबदारपणा प्रवीण वैराळे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा संताप व्यक्त करीत सुमारे ३०० जणांचा जमाव बुधवारी मोर्शी आगारात सरपंच विजय पाचारे, उपसरपंच मंगेश पवार, नीलेश चौधरी यांच्या नेतृत्वात धडकला. यावेळी अनिल अमृते, रामेश्वर चव्हाण, राजू गेडाम, योगेश धोटे, नीलेश वाडेकर, दिलीप कवटकर, सुरेश पारिसे, भाजप तालुकाध्यक्ष अजय आगरकर उपस्थित होते. प्रवीण वैराळे यांच्यावर बुधवारी अडीचच्या सुमारास हिवरखेड या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन वर्षांची चिमुकली आहे. मोर्शी आगारात जमाव धडकल्यामुळे निर्माण झालेले तणावाचे वातावरण पाहता, आगारातून एसटीचे आवागमन थांबविण्यात आले होते.अशा झाल्या वाटाघाटीप्रवीण वैराळे यांच्या पत्नीला नोकरी, ३० लाख रुपयांची मदत तसेच दोषींवर कारवाईची मागणी एसटी प्रशासनाकडे मांडण्यात आली. याप्रसंगी पोलीस व वरिष्ठ एसटी अधिकारी दाखल झाले होते. यामध्ये विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे, आगार व्यवस्थापक सुनील भालतडक, ठाणेदार राजेश राठोड, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी वीरेंद्रसिंह ठाकूर, धम्मपाल डोंगरे, कर्मचारी वर्ग अधिकारी राहुल तांबडे यांचा समावेश होता. विभाग नियंत्रकांनी आंदोलकांच्या मागणीनुसार पाच हजार रुपयांची तात्काळ मदत दिली व शैक्षणिक गुणवत्तेनुसार महामंडळात एका व्यक्तीला नोकरीचे लेखी आश्वासन दिले.