शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

केंद्रीय पथक घेणार जलजीवन कामांची ‘ऑन द स्पॉट’ झाडाझडती

By जितेंद्र दखने | Updated: March 8, 2024 22:29 IST

रविवारपासून पाच दिवस दौरा : अमरावती, अचलपूर तालुक्यात तपासणी

अमरावती: केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांची ९ ते १४ मार्चदरम्यान केंद्राच्या पथकाकडून सलग पाच दिवस विविध गावांना भेटी देऊन ‘ऑन द स्पॉट’ झाडाझडती घेतली जाणार आहे. या तपासणीकरिता केंद्राचे पथक येत असल्याने प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जलजीवन मिशनच्या कामांच्या तपासणीसाठी ए. के. सक्सेना यांच्या नेतृत्वातील सात सदस्यीय पथक अमरावती आणि अचलपूर तालुक्यातील जवळपास १५ गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन वैयक्तिक शाैचालय, सार्वजनिक स्वच्छतागृह, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व जलजीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक कुटुंबाकडील नळजोडणी तसेच पाणी गुणवत्ताविषयक बाबींची तपासणी केंद्रीय पथकाकडून केली जाणार आहे.

यासोबतच गावातील वैयक्तिक शाैचालय कुटुंबाची ऑनलाइन यादी, सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेची पाहणी, ग्रामीण आरोग्य पोषण आहार, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या बैठकीचे कार्यवृत्त दस्तऐवज तपासणी, पाणी गुणवत्ताविषयक तपासणीकरिता निवड केलेल्या पाच महिलांकडून तपासणी केलेल्या कामाची माहिती आदींचा लेखाजोखा केंद्रीय चमूकडून तपासला जाणार आहे. पाच दिवसांमध्ये केंद्र शासनाची ही चमू १५ गावांतील कामांची तपासणी करणार असल्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

...या गावात देणार भेटीजिल्हा मुख्यालयात १० मार्च रोजी सकाळी आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर दुपारी २:०० ते ४:०० या वेळेत अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी, अंबाडा कंडारी, ११ मार्चला बोर्डी, असदपूर, बळेगाव, भिलोना, अमरावती तालुक्यातील लोणटेक, मलकापूर, वडगाव माहोरे, १३ मार्च रोजी अंजनगाव बारी, कुंड सर्जापूर, कठोरा बु., नांदुरा पिंगळाई, आणि १४ मार्च रोजी अचलपूरमधील बेलखेडा, भुगाव आदी गावांत ‘ऑन द स्पॉट’ कामांची तपासणी केली जाणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती