शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

रोहयोच्या कामावर केंद्रीय पथक नाराज

By admin | Updated: December 29, 2014 00:48 IST

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाची तपासणी करण्यासाठी आलेले केंद्रीय पथक प्रमुख हेमनाथ यांना मेळघाटात प्रचंड त्रुट्या ..

नरेंद्र जावरे अचलपूरमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाची तपासणी करण्यासाठी आलेले केंद्रीय पथक प्रमुख हेमनाथ यांना मेळघाटात प्रचंड त्रुट्या आढळल्याने नाराजी व्यक्त करीत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला. परंतु नियमानुसार काहीच नसल्याने उपस्थित अधिकारी अनुत्तरित राहिले. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत अमरावती जिल्हा राज्य पातळीवर प्रथम क्रमांक पटकविण्यासाठी पात्र ठरु शकतो. तसा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात आला होता. त्या अनुषंगाने पाहणीवजा तपासणी दौरा असल्याचे सांगण्यात आले. शनिवारी केंद्रीय पथक प्रमुख हेमनाथ यांनी चिखलदरा तालुक्यातील, डोमा, काजलडोह आदी गावांना भेटी देऊन विविध कामांची पाहणी केली. तेथील कामावर कागदपत्रे अद्ययावत नसल्याने उपस्थितांचे कान उपटले व कडक शब्दात सूचना केल्यात. मग्रारोहयो कामाच्या नियमानुसार कामावर पाळणाघर नव्हते, औषधसाठा उपलब्ध नव्हता, मजुरांना बसण्यासाठी मंडप नव्हता, तर कामाची गुणवत्ता सुध्दा नसल्याचे आढळून आले. सर्वत्र ना चा पाढा दिसल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. पुढे पुढे करणारे अधिकारी हेमनाथ यांनी प्रश्नांची सरबत्ती करताच मागे सरकताना आढळले. यावेळी त्यांचेसमवेत रोहयोचे उपजिल्हाधिकारी गजेंद्र बावने, उप कार्यकारी अभियंता पाटील, धरागे, घुगे, विधाते, माडीवालेसह आदी कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यात २०१३-१४ या वर्षात झालेले चांगले काम दाखविण्याचे व कामाची तपासणी व गुणवत्ता अभियंत्याकडून करुन घेण्याचे आदेश देण्यात आले. हेमनाथ यांनी येथील शेतात काम करीत असलेल्या मजूरांशी संवाद साधला.