शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र बंद, दोन लाख पोते यार्डात

By admin | Updated: April 23, 2017 00:15 IST

जिल्ह्यातील दहा शासकीय तूर खरेदी केंद्र शनिवारपासून बंद होणार आहेत. या केंद्रावर अद्याप दोन लाख

राज्य शासनाचा केंद्राकडे प्रस्ताव : शासकीय तूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ केव्हा ? अमरावती : जिल्ह्यातील दहा शासकीय तूर खरेदी केंद्र शनिवारपासून बंद होणार आहेत. या केंद्रावर अद्याप दोन लाख पोते तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. या केंद्रांना मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला असला तरी अद्याप मुदतवाढ नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. नाफेडद्वारा चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी एफसीएद्वारा अमरावती, धामणगाव रेल्वे व डीएमओद्वारा अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, दर्यापूर व वरुड येथील शासकीय तूर खरेदी केंद्रांना १७ ते २२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ शनिवारी संपत आहे. मात्र, अद्यापपावेतो मुदतवाढ किंवा अन्य आदेश कुठल्याही केंद्रांना आले नसल्याने केंद्रावर मोजणीच्या प्रतीक्षेत असलेली दोन लाख पोते तूर केंद्राद्वारे मोजली जाणार किंवा नाही, याविषयी संभ्रम कायम आहे. नाफेडच्या राज्य संचालक विनाकुमारी यांनी अमरावती, अकोला व बुलडाणा या तीन जिल्ह्यांचा दौरा करून नाफेडच्या केंद्राची पाहणी केली. यासर्व ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागला. जिल्ह्यातील तीन केंद्रांना त्यांनी भेटी देऊन पाहणी केली. त्यांच्या अहवालानुसार राज्य शासनाने केंद्राकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठविल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनीदेखील १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पणनच्या अप्पर मुख्य सचिवांकडे १९ एप्रिल रोजी पाठविला. या सर्व पार्श्वभूमिवर केंद्रांना मुदतवाढ मिळणार की तुरीचे पोते वापस न्यावे लागणार, या संभ्रमात शेतकरी आहेत. अमरावती, दर्यापूरमध्ये सर्वाधिक पोते पडून सद्यस्थितीत दोन लाख पोते तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये अमरावती ४० हजार, दर्यापूर ३८ हजार, चांदूररेल्वे ३ हजार, नांदगाव ६ हजार, मोर्शी १३ हजार, धामणगाव १५ हजार, अचलपूर २८ हजार, अंजनगाव २१ हजार, चांदूरबाजार १४ हजार व वरुड येथे २२ हजार पोते तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, केंद्र बंद होत असल्याने तुरीची मोजणी करणार की वापस न्यावी लागणार हा संभ्रम कायम आहे.