शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

‘केंद्राचा पुन्हा वांधा, खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2017 00:14 IST

बाजार हस्तक्षेप योजनेची मुदत संपली तरी तूर खरेदी करण्यात येईल, असे आस्वासन सहकार मंत्र्यांनी दिले असले तरी

६.१३ लाख क्विंटल तूर खरेदी बाकी : मुदतवाढीसाठी शासनादेशाची प्रतीक्षालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बाजार हस्तक्षेप योजनेची मुदत संपली तरी तूर खरेदी करण्यात येईल, असे आस्वासन सहकार मंत्र्यांनी दिले असले तरी प्रत्यक्षात आदेश नसल्याने जिल्ह्यातील सर्वच १२ केंद्रांवरील तूर खरेदी गुरुवारी बंद राहिली. त्यामुळे या सर्व केंद्रांवर व शेतकऱ्यांच्या घरी किमान सहा लाख १३ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत पडून आहे. सध्या मान्सूनपूर्व पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांच्या समोर नवे संकट उभे ठाकले आहे.जिल्ह्यासह राज्यात १० मे पासून केंद्राव्दारा पीएसएस योजनेंतर्गत तुरीची खरेदी करण्यात आली. मात्र ही खरेदी २६ मे रोजी संपल्याने राज्य शासनाच्यावतीने बाजार हस्तक्षेप योजना सुरू करण्यात आली. या योजनेची मुदत ३१ मे रोजी संपली. राज्य शासनाचे वतीने पुन्हा केंद्राला विनंती करण्यात आली. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी तूर खरेदी सुरूच राहनार असल्याचे बुधवारी स्पष्ट केले होते. मात्र खरेदीदार यंत्रनेला गुरुवारी शासनाचे आदेश प्राप्त नसल्याने त्यांनी खरेदी केली नाही. शेतकऱ्यांना मात्र याबाबत कोणतीही माहिती नसल्याने शेतकऱ्यांनी केंद्रावर गर्दी केली, व तुरीची खरेदी होणार नाही, याची माहीती होताच शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.बुधवारी खरेदीदार यंत्रणाव्दारा सर्व केंद्रांवर पडून असलेल्या तुरीचे पंचनामे करण्यात आले. त्यानुसार सर्व केंद्रांवर ३१ मे रोजी २४ हजार ६९० शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले होते. या शेतकऱ्यांची पाच लाख ३१ हजार २४३ व्किंटल तूर मोजमाप अद्याप व्हायचे आहे.यामध्ये अचलपूर केंद्रावर २,२७६ शेतकऱ्यांची ४७,६२६ क्विंटल, अमरावती केंद्रावर ४३९४ शेतकऱ्यांची १,२३,४५४, अंजनगाव सुर्जी केंद्रावर २,५२५ शेतकऱ्यांची ४२,१६७, चांदूरबाजार केंद्रावर १,५४६ शेतकऱ्यांची २९,३५० चांदूररेल्वे केंद्रावर १,८५८,शेतकऱ्यांची ३६,५१५, दर्यापूर केंद्रावर ३,३५३ शेतकऱ्यांची ८७,२८६, धामणगाव केंद्रावर १,७९२ शेतकऱ्यांची ३१,७००, धारणी केंद्रावर १२७ शेतकऱ्यांची १,६३० मोर्शी केंद्रावर २,२२५ शेतकऱ्यांची ४७,८९२, नांदगाव केंद्रावर २,४४७ शेतकऱ्यांची ४७,९१२ तिवसा केंद्रावर १,१९४ शेतकऱ्यांची २४,७०० व वरूड केंद्रावर ९५३ शेतकऱ्यांची १४,९०८ क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे.