शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सेल अ‍ॅड्सकडे ३० लाख रूपये थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:33 IST

सेल अ‍ॅड्स या अभिकर्त्याकडे तब्बल ३० लाख रूपये थकीत असल्याची बाब उघड झाली आहे.

ठळक मुद्देबाजार परवानाचे अभय :उपायुक्त ,लिपिक संशयाच्या भोवºयात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सेल अ‍ॅड्स या अभिकर्त्याकडे तब्बल ३० लाख रूपये थकीत असल्याची बाब उघड झाली आहे. यात व्याजाच्या रकमेसह मागील तीन महिन्यांच्या रॉयल्टीचा समावेश आहे. सेल अ‍ॅड्स करारनाम्यातील अनेक अटी, शर्तींचा भंग करीत असताना त्यांच्यावरील मेहेरनजर मेहेरनजर राखणारे कनिष्ठ लिपिक आनंद काशीकर आणि उपायुक्त संशयाच्या भोवºयात अडकले आहेत.उपायुक्त नरेंद्र वानखडेंनीच नव्हे, तर तत्कालीन उपायुक्तांनी सुध्दा सेल अ‍ॅड्सला अभय दिल्याचे वास्तव आहे. बड्या अधिकाºयांच्या होकाराशिवाय एखादा लिपिक सेल अ‍ॅड्सला १० वर्षे मुदतवाढीचा प्रस्ताव देऊच शकत नाही, असा दावा आता होत असून आयुक्तांना अपेक्षित सुधारणांना बगल देऊन बाजार व परवाना विभागाचा लिपिक तब्बल पाच महिने फाईल दडवून ठेवतो, यात सेल अ‍ॅड्सच्या बिदागीचे लाभार्थी कोण? याचे उत्तर दडले आहे.महिन्याकाठी सुमारे ७.२५ लाख रूपये महापालिकेला देय असलेल्या सेल अ‍ॅड्सनी १ फेब्रुवारी २०१३ ते १० जुलै २०१५ या कालावधीतील रक्कम कधीही वेळेवर दिली नाही. दर ३० दिवसांनी ७.२५ लाख रूपये महापालिकेला देणे अपेक्षित असताना सेल अ‍ॅड्सने कमीतकमी ३६ व जास्तीत जास्त १९३ दिवसांपर्यंत रक्कम अदा केली नाही. त्यामुळे महापालिकेने सेल अ‍ॅड्सवर १८ टक्के व्याजाची आकारणी केली. १० जुलै २०१५ पर्यंत व्याजाची ही रक्कम १० लाख ६४ हजार २०४ रूपये झाली. माहितीनुसार त्यापैकी १,६३,१२५ रुपयांचा सेल अ‍ॅड्सनी भरणा केला. मात्र दोन वर्षांनंतरही बाजार परवाना या अभिकर्त्याकडून व्याजाची रक्कम वसूल करू शकला नाही. त्याआधारे सेल अ‍ॅड्सशी बाजार परवाना विभागाशी जुळलेले आर्थिक स्रेहबंध उघड झाले आहेत.जीएसटीचा तिढाकरारनाम्यानुसार सेल अ‍ॅड्सने महिन्याकाठी ७.२५ लाख रूपये महापालिकेला द्यायला हवे. मात्र व्याजाच्या रकमेसह सेल अ‍ॅड्सने जुलै, आॅगस्ट, सप्टेंबरची मासिक रॉयल्टी दिली नसल्याची माहिती कनिष्ठ लिपिक काशीकर यांनी दिली. जीएसटीमुळे हा तिढा निर्माण झाल्याची माहिती त्यांनी पुरविली.