शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शिवाजी शिक्षण महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

By admin | Updated: December 11, 2014 22:59 IST

श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित शिवाजी शिक्षण महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद, बंगलोर येथील नॅक कमेटीने १० व ११ आॅक्टोबर २०१४ रोजी महाविद्यायास भेट

अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित शिवाजी शिक्षण महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद, बंगलोर येथील नॅक कमेटीने १० व ११ आॅक्टोबर २०१४ रोजी महाविद्यायास भेट देऊन महाविद्यालयाचे मूल्यांकन केले. या मूल्यांकनात महाविद्यालयास सीजीपीए ३.५३ व ‘अ) श्रेणी देऊन मानांकित केले आहे. यापूर्वी श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय यास बी प्लसने मानांकित केले होते, हे विशेष.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत असलेल्या सर्व संलग्नित महाविद्यालयांपैकी शिवाजी शिक्षण महाविद्यालयास सर्वाधिक ३.५३ गुणांकन मिळालेले आहे. तसेच शिवाजी शिक्षण संस्थेंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयातून देखील या महाविद्यालयास सर्वाधिक सी. जी. पी. ए. गुण प्राप्त झाले.राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्विकृती परिषद (नॅक) च्या समितीत देबजानी सेनगुप्ता कोलकत्ता (अध्यक्ष), पी. के. गुप्ता शिलाँग (समन्वयक) तर के. आर. जयदेव आप्पा बंगलोर हे समितीचे सदस्य म्हणून महाविद्यालयात दाखल झाले होते. या चमूने अभ्यासक्रम विकसन, अभ्यासक्रमाचे विविध पैलू, अध्यायन, अध्यापन आणि मूल्यमापन, संशोधन, सल्ला आणि विस्तार, पायाभूत अध्ययन सामूग्री व पायाभूत सुविधा, विद्यार्थी सेवा व विकास, प्रशासन व नेतृत्व (नवोपक्रम) नाविन्यपूर्ण अभ्यास या सर्व बाबींची बारकाईने तपासणी करून ३.५३ सी. जी. पी. ए. दिले जे संत गाडगेबाबा विद्यापीठात तसेच विदर्भ स्तरावर सर्वाधिक आहे. या भेटीदरम्यान नॅक चमूने विद्यार्थी, पालक तसेच माजी विद्यार्थी व शिवाजी शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन यांचेशी संवाद साधून त्यांच्या सर्व शंकांचे समाधान करून घेतले. सोबतच शिक्षण व शारीरिक शिक्षण विभागातील सर्व सुविधांची पाहणी केली.महाविद्यालयात नॅक येण्यापूर्वी शिवाजी शिक्षण संस्थेने नेमलेली संस्था मूल्यांकन व अधिस्विकृती परिषदेने भेट दिली. भेटीदरम्यान संस्थेचे अध्यक्ष अरूण शेळके, उच्च शिक्षण संचालक व्ही. एस. जामोदे, प्राचार्य वि. गो. ठाकरे, निर्मला वानखडे यांच्या समितीने भेट देऊन महाविद्यालयात विविध विभागांची तपासणी केली. या समितीने मार्गदर्शन केल्यानेच नॅक समितीला महाविद्यालय संपूर्ण आत्मविश्वासाने सामोरे गेले. या यशात प्राचार्य मीना रोकडे, समन्वयक वनिता काळे, संजय खडसे, किशोर क्षत्रिय, अंजली ठाकरे, अमित गावंडे, संगीता बिहाडे, ग्रंथपाल वंदना खाकरे, शिक्षकेत्तर कर्मचारी नरेश माहुरे, नीलेश ठाकरे, रवींद्र जोजारे, अमोल देशमुख, प्रकाश अवझाड, धिरज देशमुख, संजय बोबडे, सागर महिंगे, ज्ञानेश्वर ठाकरेसह बी.एड.चे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.