आरटीओ चौकात जल्लोष: मान्यवरांच्या हस्ते गुणवंताचा गौरव अमरावती : राजमाता जिजाऊ यांची ४१८ वी जयंती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयालगत राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याजवळ गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चरित्र्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सद्गुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊंचा जयंती उत्सव साजरा करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. हा जयंत्युत्सव जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी साजरा करण्यात आला. यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती प्राचार्य संयोगीता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख, विदर्भ ज्ञान विज्ञानच्या संचालिका संगीता येवले, सुजाता झाडे, नगरसेविका उपस्थित होत्या. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य संयोगीता देशमुख यांनी राजमाता जिजाऊंचे महत्त्व पटवून दिले. भारतीय मातांवर जिजाऊंचे संस्कार आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच अमिरिकेत बराक ओबामा यांनी आपल्या भाषणात अमेरिकन मातांनी भारतीय मातासारखे व्हावे, असे सांगितले होते. संगीता येवले यांनीही महिलांना जिजाऊची प्रेरणा घेऊन स्वत:ला घडवावे, असे मत व्यक्त केले. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या महिला संगीता येवले, सांजली वानखडे, कीर्ती पिंजरकर योगिता पिंजरकर यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख, किरण महल्ले आकाशवाणीप्रमुख शर्मा यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक माजी महापौर किरण महल्ले यांनी, तर संचालन सीमा देशमुख यांनी केले. आभार शीला पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला जिजाऊ बिग्रडेजच्या जिल्हाध्यक्षा कांजन उल्हे, कीर्तीमाला चौधरी, सुशीला देशमुख, शोभना देशमुख, ज्योती इंगळे, प्रभा आवारे, संजीवनी पेठे, आशा कदम, कल्पना वानखडे, प्रतिभा रोेडे , पदमा महल्ले, कुसूम रोडे, भाग्यश्री मोहिते, सुरेखा लुंगारे, माया गावंडे, मैथाली पाटील, वैशाली कोल्हे, कल्पना गावंडे, पल्लवी केचे, मंजू ठाकरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी मनाली तायडे, श्वेता बोके, प्रिती देशमुख, स्नेहल, वसू रोहिणी इंगळे, शैलजा काळमेघ, कविता उगले. प्रेरणा बामणे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी) अर्तदातर्फे मां जिजाऊ जन्मोत्सवअमरावती : अॅडव्होकसी, रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग फॉर डेव्हलपमेंट अॅक्शन (अर्तदा)च्या वतीने १२ जानेवारी रोजी आरटीओ चौकस्थित मां जिजाऊ यांच्या पुतळ्याला हारार्पण व अभिवादन केले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अरविंद गावंडे, सचिव विशाल ठाकरे, नरेंद्र वाकोडे, विलास पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. संचालन सुखदेव उंदरे, तर आभार प्रवीण भिवरीकर यांनी मानले.
अंबानगरीत राजमाता जिजाऊंची जयंती उत्सवात साजरी
By admin | Updated: January 13, 2017 00:06 IST