शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मेजर ध्यानचंद यांची जयंती क्रीडा उपक्रमाने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:18 IST

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व शारीरिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देराष्ट्रीय क्रीडा दिन साजरा : शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व शारीरिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी स्थानिक ज्ञानमाता हायस्कूल ते पंचवटी चौक दरम्यान रॅली काढून विद्यार्थ्यांनी क्रीडा जनजागृती केली.मेजर ध्यानचंद यांचे हॉकी खेळाबाबतचे योगदान हे सर्वदूर प्रसिद्ध आहे. केंद्र सरकारने मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस २९ आॅगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. क्रीडा खेळांबाबत प्रचार व प्रसार करणे हा हेतू सुद्धा शासनाचा आहे. त्याअनुषंगाने मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शहरातील सुमारे १० शाळांच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा जनजागृती रॅलीत सहभाग घेतला. रॅलीत ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होते. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘खेलोंगे तो जियोगें’, निरोगी आरोग्यासाठी मैदानी खेळ आवश्यक’ असे गगनभेदी नारे देऊन क्रीडा जनजागृती केली. श्री. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रागंणात पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमात शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नितीन चवाळ, शिवदत्ता ढवळे, संदेश गिरी, मेंहदी अली, प्राचार्य रवींद्र कडू, जिल्हाक्रीडाधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते.शिवटेकडीवर हव्याप्र मंडळाच्या खेळाडूंनी चित्तथरारक क्रीडा प्रात्यक्षिक सादर केली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, माधुरी चेंडके, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, नगरसेवक दिनेश बूब, उपायुक्त नरेंद्र वानखडे, प्रमोद येवतीकर, प्राचार्य देवनाथ, जयंत इंगोले, विजय दलाल गोविंद कासट, केनीडी सिंग, दिनानाथ नवाथे आदी उपस्थित हाते.कारागृहात मल्लखांब, योग प्रात्यक्षिकजिल्हा मध्यवर्ती कारागृहात मेजर ध्यानचंद यांची जयंती क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या खेळाडुंनी मल्लखांब, योग व कुस्ती या क्रीडा प्रकारावर आधारित नेत्रदीपक प्रात्यक्षिक सादर करून बंदीजणांना खेळाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, अशोक जाधव, गोविंद कासट, मधुकर बुरनासे, प्राचार्य देवनाथ, रावलाणी आदी उपस्थित होते.