सुपर कोविड हॉस्पिटलचा उपक्रम
अमरावती : कोरोनाचा वाढता कहर नियंत्रणात आणण्याकरिता अहोरात्र सेवा देणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील महिला वैद्यकीय कर्मचाऱ्यांची महिला दिनानिमित्त सोमवारी ऑनड्युटीसन्मान करण्यात आला. हा उपक्रम सोशल डिस्टन्स राखून राबविण्यात आला.
अमरावती जिल्ह्यात सध्या कोरोनाचा हाहाकार मजला आहे. सध्या अवघ्या देशात हॉट स्पॉट म्हणून अमरावतीकडे पाहिले जात आहे. रोज वाढत असलेल्या रुग्णाची संख्या बघता कोविड योद्ध्यांची दमछाक होत आहे. तरी अशा परिस्थितीत सुपर कोविड हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, सफाई कर्मचारी जीवाची बाजी लावून कोरोना रुग्णांची काळजी घेत आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोमवारी या कोविड सेंटरमधील महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. अक्षदा तुरखडे, मेट्रन ललिता अटाळकर, वाॅर्ड इंचार्ज प्रियांका गजभिये, स्टाफ नर्स चेतना पाचकवडे, पूजा परिहार, कोमल कंटाळे, रोहित ताथोड, अविनाश सुपले, पृथ्वीराज राठोड आदी उपस्थित होते. कार्यक्रमात ललिता अटाळकर यांनी सर्व कोविड रुग्णांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रियांका गजभिये यांनी केले.