मोहन राऊत - अमरावतीजिल्हा परिषद, पंचायत समितीमधील कामचुकार कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करता यावी, भ्रष्टाचाराला लगाम लावता यावा यासाठी ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. राज्याचे ग्रामीण विकास मंत्रालय प्रत्येक विभागाशी थेट संपर्क साधणार आहे़जिल्हा परिषद स्तरावर सामान्य प्रशासन, लेखा व वित्त, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण, पंचायत, आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण, लघुसिंचन, कृषी, पशुसवंर्धन आदी विभाग येतात. यामध्ये जिल्हा परिषद स्तरावर अधिकारी तसेच कर्मचारी कार्यरत आहेत़ दैनंदिन कामकाज सांभाळताना काही कर्मचारी इमाने-इतबारे कामे करतात तर काही दिवसांतून अनेकवेळा चहा व नाश्त्याच्या टपरीवर दिसतात. या विभागात गरजू लाभार्थ्यांची कामे होत नसल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर ग्रामीण विकास मंत्रालयापर्यंत आजही धूळखात पडल्या आहेत़ संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुख्य पुरावा अधिकाऱ्यांजवळ नसल्यामुळे कोणतीच कारवाई या कर्मचाऱ्यांवर करता येत नाही़ हीच स्थिती पंचायत समितीची आहे़ ग्रामविकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ई-पंचायत व संग्राम प्रकल्पांतर्गत पंचायत राज संस्थांना महाआॅनलाईन जोडण्याचे काम युध्दस्तरावर सुरू आहे़ या ई-गव्हर्नन्सची प्रभावी अंमलबजावणी राज्यात सुरू आहे़ आता या खात्याने प्रत्येक जिल्हापरिषद व पंचायत समिती स्तरावर माहिेती व तंत्रज्ञान कक्ष स्थापन करण्याला मंजुरात दिली या कक्षाच्या माध्यमातून जि़प़व प़स़चे संकेत स्थळ अद्यावत करण्यात येणार आहे़ व्हिउीओ कॉॅन्फरन्स सुविधा , बायोमेट्रीक सुविधा, सीसीटीव्ही यंत्रणा, अद्यावत करण्यात येणार आहे़ प्रत्येक विभागात सीसीटीव्ही यंत्रणा बसवून मुख्य संगणक जि़प़मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पं़स़स्तरावर गटविकास अधिकारी कार्यालयात राहणार आहेत़ कोणत्या विभागाचे कर्मचारी किती वाजता कार्यालयात आलेत. दौऱ्यावर जाण्याची वेळ तसेच दिवसभर किती फाईलचे कामकाज पूर्ण केलेत याची संपूर्ण माहितीची नोंद सीसीटीव्ही कॅमेराद्वारे होणार आहे़ ग्रामीण विकास खात्याचे अधिकारी प्रत्येक जि़प़व पं़स़चा कारभार आॅनलाईन कोणत्याही क्षणी पाहू शकणार आहे़ संबंधित कर्मचारी आपल्या टेबलवर न आढळल्यास प्रथम कारणे दाखवा नोटीस तंद्नंतर कारवाई करण्याची प्रक्रिया पुढील काळात होणार आहे़
जिल्हा परिषद,पंचायत समितीत सीसीटीव्ही
By admin | Updated: September 4, 2014 23:28 IST