शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
6
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
8
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
9
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
10
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
11
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
12
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
13
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
14
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
15
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
16
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
17
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
18
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
19
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
20
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा

लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:50 IST

वाढत्या चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाने लांब पल्ल्यांच्या काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा बलासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची जोड असणार आहे.

ठळक मुद्देप्रवाशांची सुरक्षितता : मध्य रेल्वे मुंबई विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वाढत्या चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाने लांब पल्ल्यांच्या काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा बलासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची जोड असणार आहे.रेल्वे गाड्यांमध्ये चोरांनी हैदोस घातला आहे. विशेषत: चोरट्यांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांना लक्ष्य केले आहे. परिणामी चोरट्यांसह खिसेकापूंवर पाळत ठेवण्यासाठी डब्यांमध्ये दर्शनी भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून प्रवाशांची सुरक्षितता केली जाणार आहे. रेल्वे गाड्यात चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यात रेल्वे सुरक्षा बलाला अपयश आल्याबाबत यंत्रणेवर टीका होत आहे. यापूर्वी रेल्वे प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर मुंबई ते दिल्ली राजधानी एक्सप्रेसच्या चार डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रयोग यशस्वी केला.आता लांब पल्ल्यांच्या गाड्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.या गाड्यांमध्येलागणार सीसीटीव्हीमुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाहून सुटणाºया काही महत्त्वाच्या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहे. यात भुसावळ, नागपूरमार्गे ये- जा करणाºया रेल्वे गाड्यांचा समावेश असणार आहे. हावडा-मुंबई मेल, मुंबई-हावडा गितांजली एक्सप्रेस, कुर्ला-हावडा शालीमार एक्सप्रेस, गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस, हावडा-मुंबई सुपर डिलक्स एक्सप्रेस या गाड्यांमधील डब्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे प्रवाशांची सुरक्षितता होणार आहे.रेल्वे गाड्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय प्रशंसनीय आहे. चोरट्यांवर यामाध्यमातून नियंत्रण मिळविता येईल. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये सीसीटीव्ही गरजेचे आहे.- व्ही.डी. कुंभारेवाणिज्य मंडळ निरीक्षक