शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

बिगर आदिवासींना ‘कास्ट व्हॅलिडिटी’?; अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती संशयाच्या भोव-यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 16:41 IST

आदिवासी विकास विभागाच्या अधिनिस्त अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने बिगर आदिवासींना ‘कास्ट व्हॅलिडिटी’ दिल्याप्रकरणाची धक्कादायक माहिती उजेडात आली.

- गणेश वासनिक

अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अधिनिस्त अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने बिगर आदिवासींना ‘कास्ट व्हॅलिडिटी’ दिल्याप्रकरणाची धक्कादायक माहिती उजेडात आली. ठाकूर, कोष्टी, माना अशा संवर्गातील बिगर आदिवासींना ‘एसटी’ संवर्गाचे जातवैधता प्रमाणपत्र देण्यात आले आहे.शिक्षण, नोकरी, राजकारण अशा विविध क्षेत्रात बिगर आदिवासींनी बनावट जातवैधता प्रमाणपत्र तयार करून खºया आदिवासींवर कब्जा केल्याची बाब आता नवीन राहिलेली नाही. ज्यांचा आदिवासी समूहांशी काहीही संबंध नाही, अशांनीदेखील नामसाधर्म्याचा फायदा घेत आदिवासी समाजाचे जातवैधता प्रमाणपत्र तयार करवून विविध सवलती घेत आहेत. धनगर, कोष्टी, हलबा कोळी, महादेव कोळी अशा विविध संवर्गातील समूहाने आदिवासी आरक्षणाची मागणी केली आहे. ही मागणी केंद्र व राज्य शासनाच्या विचाराधीन असली तरी बिगर आदिवासींनी एका वेगळ्या पद्धतीने ‘एसटी’चे जातवैधता प्रमाणपत्र तयार करून घुसखोरी चालविली आहे. ठाकूर ही जमात आदिवासी समाजात मोडत नसताना या जमातीला आदिवासी समाजाचे जातवैधता प्रमाणपत्र दिले कसे, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. बोगस आदिवासींनी घुसखोरी चालविली, हा विषय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया ‘तारीख पे तारीख’ अशी सुरू असल्याने बोगस आदिवासींचे  फावत आहे. ‘कास्ट व्हॅलिडिटी’प्रकरणी संबंधित अधिकाºयांकडून चिरिमिरी करवून बोगस आदिवासींना वैधता प्रमाणपत्र दिले जात असल्याप्रकरणी आदिवासी समाजाचे नेतेदेखील आता हतबल झाले आहे. कारण शासन, प्रशासनसुद्धा प्रसंगी बोगस आदिवासींची पाठराखण करते, असा आदिवासी समाजाचा आक्षेप आहे. त्यामुळेच खºया आदिवासींमध्ये बोगस आदिवासींनी जातवैधता प्रमाणपत्र मिळवून घुसखोरी चालविली आहे.

इंगळे, वार्डेकर, गाठे, मोरे, साहू झालेत आदिवासीअमरावती येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यातील ठाकूर जमातीला आदिवासी समाजाचे अधिकृत जातवैधता प्रमाणपत्र दिले आहे. यात राजू इंगळे, सुनीता इंगळे, संगीता इंगळे, शीला गाठे, नंदकुमार मोरे, निर्मला इंगळे हे ठाकूर जमातीचे आहेत. तर, अजय वार्डेकर हे माना व सुधीर साहू हे हलबा जमातीचे आहेत. या सर्वांनी ‘एसटी’ संवर्गातून कास्ट व्हॅलिडिटी मिळविल्याची माहिती हाती आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार, ठाकूर जमातीला आदिवासी ‘कास्ट व्हॅलिडिटी’ देण्यात आली आहे. यापूर्वी समितीने ठाकूर जमातीला ‘कास्ट व्हॅलिडिटी’ नाकारली. न्यायालयीन आदेशानुसार संबंधितांना जातवैधता प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र, आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात विभागाकडून याचिका दाखल केली जाईल.- प्रिती बोंद्रे,उपसंचालक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती