शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कॅशियरने केली ६१ लाखांची अफरातफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 22:08 IST

शोरूममधील आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या कॅशियरनेच ६१ लाख ४७ हजार ४० रुपयाने फसवणूक केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. अमित दामोधर भोसले (३८, रा. हमालपुरा) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला दोन दि२वसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देअटक : कार शोरूम संचालकाची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शोरूममधील आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या कॅशियरनेच ६१ लाख ४७ हजार ४० रुपयाने फसवणूक केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. अमित दामोधर भोसले (३८, रा. हमालपुरा) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याला दोन दि२वसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.सातुर्णा स्थित अस्पा बंड सन्स या कार शोरूमचे संचालक सत्यजित विजय बंड (५०, रा. जोशीवाडी) यांनी मंगळवारी रात्री राजापेठ पोलिसांत तक्रार नोंदविली. अमित हा दीड वर्षांपासून कॅशियर पदावर कार्यरत होता. ग्राहकांकडून मिळालेल्या रकमांच्या नोंदी, बँक रजिस्टरच्या नोंंदी, सेल्स कॅश बूक, बँक कॅशबूक अशा सर्व नोंदींची जबाबदारी अमित भोसलेकडे होती. अमितने कॅशबूक व अन्य रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी घेऊन ग्राहकांकडील रकमेचे गबन केल्याचे शोरूमच्या आर्थिक आॅडीटवरून निदर्शनास आले. अमितने अशाप्रकारे ६१ लाख ४७ हजार ४० रुपयांची अफरातफर केल्याचे शोरूम संचालक सत्यजित बंड यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अमितने केलेल्या अफरातफर व फसवणुकीची तक्रार त्यांनी राजापेठ पोलिसांत नोंदविली आहे. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोकुल ठाकूर यांनी केला असून, आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०८, ४२० अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गजानन मेहेत्रे पुढील तपास करीत आहेत.कॅशियरने आर्थिक व्यवहारांच्या चुकीच्या नोंदी घेऊन फसवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार तात्काळ आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.- किशोर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, राजापेठ ठाणे.