शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काऊंटरमधील रोख चोरणारे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:32 IST

बडनेरा येथील कृषी सेवा केंद्राच्या काऊन्टरमधून रोख चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. कपिल रमेश भाटी (२१), आशुतोष ऊर्फ आशू लखनलाल पातालवंशी (१९, दोन्ही रा. बेलपुरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई : बडनेरा हद्दीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा येथील कृषी सेवा केंद्राच्या काऊन्टरमधून रोख चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. कपिल रमेश भाटी (२१), आशुतोष ऊर्फ आशू लखनलाल पातालवंशी (१९, दोन्ही रा. बेलपुरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.बडनेरा येथील आठवडी बाजारात रोशन गजानन पोहणे यांचे केएसके सप्लायर्स नावाचे कृषी सेवा केंद्र आहे. २० आॅक्टोबर रोजी पोहणे यांच्या कृषी केंद्रात दोन अज्ञात व्यक्ती आले. त्यांनी थ्रिनेटची मागणी केली. दरम्यान पोहणे दुकानाच्या आत गेले असता, अज्ञातांनी काउंटरच्या गल्ल्यातील २५ हजार ९०० रुपये लंपास केले. याप्रकरणात बडनेरा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविच्या कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. घटनेच्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास सुरू करून कपिल भाटी व आशुतोषची बारकाईने चौकशी केली. त्यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्याजवळील १७ हजार रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. ही कारवाई पोलीस आयुक्त संजयकुमार बावीस्कर, पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आशिष देशमुख, पोलीस शिपाई राजेश पाटील, राजू आप्पा बाहेनकर, सैय्यद इमरान, दिनेश नांदे, इजाज शाह, निवृत्ती काकडे, चालक गजानन सातंगे यांच्या पथकाने केली आहे.कपिल भाटी सराईत गुन्हेगारआरोपी कपिल भाटी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध राजापेठ व फे्रजरपुरा ठाण्यात दोन चोरीच्या गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. अमरावती ग्रामीण हद्दीतील चांदूररेल्वे हद्दीत एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.