शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

फॉल्टी उत्तरपत्रिका प्रकरणी २६ लाखांचा दंड, विद्यापीठाकडून कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 19:37 IST

उत्तरपत्रिकांच्या पुरवठा दरम्यान निकष, अटी, शर्थीचे पालन झाले अथवा नाही, याचा शोध समिती घेते.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ‘फॉल्टी’ उत्तरपत्रिकाप्रकरणी संबंधित कंत्राटदारांना २६ लाखांचा दंड आकारला आहे. रॅण्डम पद्धतीने उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणी करून दंड वसुलीची कार्यवाही करण्यात आली आहे. तब्बल चार तासांच्या छानणीनंतर या कार्यवाहीचा निर्णय घेण्यात आला.

विद्यापीठाने उन्हाळी व हिवाळी २०२० परीक्षेसाठी ४० लाख उत्तरपत्रिकांचा पुरवठा केला आहे. २४ पानी उत्तरपत्रिका प्रति ३ रुपये २१ पैसे दराने पुरवठा करण्यात आला आहे. मात्र, उत्तरपत्रिकांचे देयके अदा करण्यापूर्वी संबंधित कंत्राटदारांनी पुरवठा व्यवस्थित केला अथवा नाही, याची उलटतपासणी करण्यात आली. त्यानुसार ४० लाखांपैकी ७ लाख उत्तरपत्रिका ‘फॉल्टी’ ठरविण्यात आल्या आहेत.

उत्तरपत्रिकांच्या पुरवठा दरम्यान निकष, अटी, शर्थीचे पालन झाले अथवा नाही, याचा शोध समिती घेते. त्याअनुषंगाने उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणी करण्यात आले. रॅण्डम पद्धतीने तपासणी करून १९.८३ टक्के उत्तरपत्रिका ‘फॉल्टी’ ठरविण्यात आल्या आहेत. ही सर्व प्रक्रिया संबंधित पुरवठादाराच्यासमक्ष गुरूवार, ५ मार्च रोजी पार पडली. उत्तरपत्रिकांचा पुरवठा गुजरातच्या खेड येथील बिंदीया इंटरप्रायजेसने केला आहे. ४० लाख उत्तरपत्रिकांच्या पुरवठ्याचे देयके १ कोटी ३० लाख रुपये एवढे कंत्राटदराने सादर केले होते. मात्र, क्रॉस चेकींगमध्ये उणिवा, त्रुटी आढळल्या असून, उत्तरपत्रिकांमध्ये ‘फॉल्टी’प्रकरणी २६ लाख २६ हजार ८१६ रुपयांच्या दंड वसूल केला जाणार आहे.समितीकडून दंड आकारणी, अहवाल तयारउत्तरपत्रिकांसंदर्भात प्राप्त तक्रारीच्या आधारे गठित समितीकडून तपासणी करून दंड आकारण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल तयार असून, कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला जाणार आहे. समितीचे अध्यक्ष परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक  हेमंत देशमुख, वित्त व लेखाअधिकारी भारत क-हाड, उपकुलसचिव मोनाली वानखडे, दादाराव चव्हाण आदींनी उत्तरपत्रिका तपासणीचे कामकाज बघितले. उत्तरपत्रिकांची तपासणी रॅण्डम पद्धतीने करण्यात आली. यात ७ लाख उत्तरपत्रिका ‘फॉल्टी’ ठरविण्यात आल्या असून २६ लाख २६ हजार ८१६ रूपये दंड आकारला आहे. ही बाब संबंधित पुरवठादाराने मान्य केली असून, त्याने तसे लेखी दिले आहे.   - हेमंत देशमुख,  (संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ)

टॅग्स :Amravatiअमरावती