शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘क्रॉईम लॉ’चा पेपर फुटल्याप्रकरणी चौकशी

By admin | Updated: May 13, 2017 00:08 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षा विभागाचा कारभार पारदर्शकपणे असावा, यासाठी ‘एन्ड टू एन्ड’ आॅनलाईन कारभार सुरू केला आहे.

चमू जरुडात : आॅनलाईन प्रश्नपत्रिका वितरणावर प्रश्नचिन्ह लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षा विभागाचा कारभार पारदर्शकपणे असावा, यासाठी ‘एन्ड टू एन्ड’ आॅनलाईन कारभार सुरू केला आहे. मात्र उन्हाळी परीक्षेचा ‘क्रॉईम लॉ’ या विषयाचा ९ मे रोजी झालेला पेपर तासभरापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपवर टाकल्याप्रकरणी विद्यापीठाने चौकशी आरंभली आहे. त्याअनुषंगाने जरुड येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात विद्यापीठाची चमू दाखल झाली आहे.कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांच्या आदेशानुसार ‘क्रॉईम लॉ’ विषयाचा पेपर फुटल्याप्रकरणी चौकशी करून संबंधितांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याची सूचना त्यांनी दिली आहे. त्यानुसार परीक्षा मंडळाचे संचालक जयंत वडते यांच्या अध्यक्षतेखाली चमू व्हॉट्सअपवर ‘क्राईम ला’चा पेपर तासभरापूर्वी व्हायरल झाल्याप्रकरणी चौकशीसाठी पोहोचली आहे. जरुड येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचारकाने हा पेपर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केल्याने विद्यापीठाच्या ग्रुपवर ही माहिती धडकली आहे. पेपर सुरू होण्याआधीच विधी अभ्यासक्रमाचा पेपर व्हायरल होत असेल तर विद्यापीठाचा गोपनीय विभाग काय करतो, हा सवाल उपस्थित होतो. परीक्षा केंद्रावर आॅनलाईन पेपर कसा, कोणी बाहेर काढायचा ही नियमावली ठरविली आहे. आॅनलाईन पेपर काढताना त्या ठिकाणी कोण अधिकारी असावेत, हेदेखील मार्गदर्शक तत्त्वानुसार निश्चित आहे. असे असताना ९ मे रोजी जरुड येथे कला, वाणिज्य महाविद्यालयात ‘क्रॉईम लॉ’चा पेपर काढताना तेथे प्रयोगशाळा परिचारक काय करीत होता, हा संशोधानाचा विषय आहे. हा पेपर ‘एसजीबीयू’ समर एक्झाम या विद्यापीठाच्या व्हॉट्सअपवर गृ्रपवर पोहचविला. या ग्रुपवर विद्यापीठाचे सर्व परीक्षा कें द्रावरील केंद्राधिकारी समाविष्ट आहे. परीक्षा केंद्रावर वितरित केलेल्या आॅनलाईन प्रश्नपत्रिका अर्धातासापूर्वी पोहचविण्यात आल्यात. त्या प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स काढून ती विद्यार्थ्यांना केंद्रावर मिळणे अपेक्षित आहे. परंतु जरुड येथील कला, वाणिज्य महाविद्यालयातून एक तास १० मिनिटांपूर्वी हा पेपर व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सायबर सेलकडे तपास जाण्याची शक्यताजरुड येथील कला, वाणिज्य महाविद्यलयातील प्रयोगशाळा परिचारकाने ‘क्रॉईम लॉ’ चा पेपर व्हॉटस्अपवर व्हायरल केल्याप्रकरणी विद्यापीठ प्रशासन हे प्रकरण पुढील तपासासाठी सायबर सेलकडे देणार असल्याची माहिती आहे. पेपर तासभरांपूर्वी कशासाठी व्हॉटस्अपवर व्हायरल झाला, याचा शोध घेणे हे विद्यापीठ प्रशासनासाठी आव्हानात्मक आहे.विधी अभ्यासक्रमाचा ‘क्रॉईम’ या विषयाचा पेपर व्हॉट्अपवर तासभरापूर्वी पाठविल्याप्रकरणी चौकशी सुरु झाली आहे. जरुड येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात चमू पोहचली आहे. यात वस्तुनिष्ठ चौकशी करुन संबंधितांवर कायदेशिर कारवाई होईल.- जयंत वडते, संचालक, परीक्षा मंडळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ