शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आंबे पिकविण्यासाठी कार्बाईड

By admin | Updated: April 24, 2015 00:15 IST

आंबे पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर करणाऱ्या जुना कॉटन मार्केटमधील आंबे विक्रेत्याच्या दुकानावर...

अमरावती : आंबे पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर करणाऱ्या जुना कॉटन मार्केटमधील आंबे विक्रेत्याच्या दुकानावर गुरूवारी दुपारी १.३० वाजतादरम्यान अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून कारवाई केली. बाजार समितीच्या जुन्या कॉटन मार्केटमध्ये घाऊक फळविक्रेत्यांची दुकाने आहेत. गुरूवारी या सर्व दुकानांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान महेशकुमार बानोमल या फळविक्रेत्याच्या ७० क्रमांकाच्या दुकानात तब्बल ३६० किलो आंबे कार्बाईडचा वापर करून पिकवित असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी फळविक्रेता रवी कन्हैयालाल गनवानी यांच्याकडून आंबा व कार्बाईड पावडरचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे. तपासणी अहवाल आल्यानंतर संबंधितांविरूध्द अन्न सुरक्षा व मानद कायदा २००६ च्या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. ही कारवाई अन्न, औषधी प्रशासन विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई, सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी जयंत वाणे, राजेश यादव व फरीद सिद्दीकी यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणातील दोषींवर सहा वर्षांपर्यंत कारावास व पाच लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या कारवाईमुळे फळविक्रेत्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)