अमरावती: इंडिका उलटून झालेल्या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झालेत. नांदगाव पेठ पोलीस ठाण्यांतर्गत नागपूर मार्गावरील चौपाल सागर समोर बुधवारी दुपारी ३ वाजता हा घटना घडली. मनीष बन्सीधर पंचगाम (४0,रा. फ्रेजरपुरा), अभिमान दामोदर गवई (६८, विजय कॉलनी) व हयाजोद्दीन कयमोद्दीन खान ( ४0, तारखेडा) अशी जखमींची नावे आहेत. मनीष पंचगाम हे जि. प उपाध्याक्ष जयप्रकाश पटेल यांचे स्विय सहाय्यक आहे. ते बुधवारी दुपारी ३ वाजता त्यांचे सहकारी अभिमान गवई व हयाजोद्दीन यांच्यासह एम एच २१ -४१२७ क्रमांकाच्या इंडिका कारने अमरावती येथून काही कामानिमित्त तिवसा येथे जात होते. नागपूर मार्गावरील चौपाल सागरजवळ त्यांच्या विरुद्ध दिशेने दुचाकीवर एक महिला आली. महिलेल्या वाचवीण्याचा प्रयत्नात असताना मनीष यांचे वाहनावरुन नियंत्रण सुटले व इंडिका कार पलटली. यामध्ये हे तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी उसळल्याने नागपूर मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती नांदगाव पेठ पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करुन तेथील वाहतूक सुरळीत केली. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी पोलिसांची कारवाई सुरु होती. घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळली होती.
कार उलटली; तीन गंभीर जखमी
By admin | Updated: May 22, 2014 00:42 IST