शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कार उड्डाणपुलाच्या पिलरला धडकली; एक ठार, चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:15 IST

भरधाव कार उड्डाणपुलाच्या पिलरला धडकल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर चार गंभीर जखमी झाले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ते सर्र्वेक्षण करण्यासाठी आले होते. शाहू राजू भोसले (३४, रा. बदलापूर) असे मृताचे, तर शैलेश धमरे (४८, रा. मुंबई), श्रेयस श्रीराम कटक (२८, रा. सांगली), आकाश कश्यप (२६) व तुषार मुरलीधर भुतडा (२८, रा. साईनगर) अशी जखमींची नावे आहेत.

ठळक मुद्देराजकमल चौकात मध्यरात्री भीषण अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भरधाव कार उड्डाणपुलाच्या पिलरला धडकल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर चार गंभीर जखमी झाले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ते सर्र्वेक्षण करण्यासाठी आले होते. शाहू राजू भोसले (३४, रा. बदलापूर) असे मृताचे, तर शैलेश धमरे (४८, रा. मुंबई), श्रेयस श्रीराम कटक (२८, रा. सांगली), आकाश कश्यप (२६) व तुषार मुरलीधर भुतडा (२८, रा. साईनगर) अशी जखमींची नावे आहेत.आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मीडिया सोल्यूशनचे काही अधिकारी व कर्मचारी अमरावतीत सर्वेक्षणासाठी आले. शनिवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास ते कामे आटोपून कार (एमएच २७ एबी-०००९) ने इर्विन चौकात पोहोचले. त्यांनी चालकास सिगारेट घेण्यासाठी पानटपरीवर पाठविले. सिगारेट न मिळाल्याचे पाहून चालकास तेथेच सोडून शाहू भोसले याने कारचा ताबा घेत जयस्तंभ चौकाच्या दिशेने भरधाव नेली. राजकमल चौकाकडे वळण घेत असताना भरधाव कारचा टायर फुटला आणि श्याम चौकातील उड्डानपुलाच्या पिलरला कार आदळली. यात शाहू जागीच ठार झाला, तर सोबतचे चौघेही जखमी झाले. काही अंतरावर असणारे कोतवालीचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावून गेले. पोलिसांनी जखमींना कारमधून बाहेर काढून तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. कोतवाली पोलिसांनी मृतकाविरुद्ध भादंविचे कलम ३०४ (अ), ३३७, ३३८, ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची नवनीत राणा यांनी शनिवारी भेट घेतली.