शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

न्यायालय परिसरात कारला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:19 IST

नवीन कौटुंबिक न्यायालय परिसरात पार्किंगमधील एका कारमध्ये आग लागल्याने सोमवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास प्रचंड खळबळ उडाली. अग्निशमन पोहोचेपर्यंत कार पुढील बाजूने आगीच्या विळख्यात सापडून जळून खाक झाली होती. या घटनेमुळे न्यायालयातील वकील मंडळींची तारांबळ उडाली होती.

ठळक मुद्देखळबळ : वकील मंडळींची तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवीन कौटुंबिक न्यायालय परिसरात पार्किंगमधील एका कारमध्ये आग लागल्याने सोमवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास प्रचंड खळबळ उडाली. अग्निशमन पोहोचेपर्यंत कार पुढील बाजूने आगीच्या विळख्यात सापडून जळून खाक झाली होती. या घटनेमुळे न्यायालयातील वकील मंडळींची तारांबळ उडाली होती.वरिष्ठ विधिज्ञ बाळासाहेब गंधे यांचे चालक सुदाम विठ्ठल बान्ते यांनी कार (एमएच २७ एआर-२६१३) सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंगस्थळी उभी केली. तत्पूर्वी, विठ्ठल बांन्ते यांनी बाळासाहेब गंधे यांना न्यायालयात सोडले. कार पार्क होताच बॉनेटमधून धूर निघत असल्याचे बान्तेंच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी बॉनेट उघडून पाहिले. यावेळी आगीच्या ज्वाळा निघत होत्या. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे बान्तेही कारपासून दूर झाले.कारला आग लागल्याचे पाहून न्यायालय परिसरातील प्रचंड गर्दी जमली. त्याच्या आजूबाजूला कार पार्क केल्या होत्या. त्यामुळे आगीच्या झळा अन्य कारपर्यंत पोहोचत होत्या. ही बाब लक्षात घेता तेथील काही नागरिकांनी गंधे यांच्या कारच्या आजूबाजूला असणाऱ्या दोन्ही कारच्या काचा फोडून त्या दूर सारल्या.दरम्यान, पेटत्या कारच्या टायर फुटल्याने मोठा आवाज झाला आणि तेथे उपस्थित नागरिक जीव वाचविण्याच्या भीतीने सैरावैरा पळत सुटले. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान न्यायालय परिसरात पोहोचले आणि त्यांनी तत्काळ आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. काही वेळात आग विझविण्यात त्यांना यश मिळाले. मात्र, या आगीत गंधे यांच्या कारचा पुढील भाग भस्मसात झाली. या माहितीवरून काही न्यायाधीशांनी घटनास्थळाची पाहणी केली.दोन कार बचावल्यान्यायालय परिसरातील कारने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील जीवीशा घटकाचे सोयम खान व कुणाल काकडे यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली. पेटत्या कारच्या आजूबाजूला वकील एस.बी. राऊत व कृष्णा जतारिया नामक व्यक्तीची कार होती. पेटत्या कारची झळ लागल्यामुळे दोन्ही कार पेटण्याची भीती होती. त्यामुळे नागरिकांनी दोन्ही कारच्या काचा फोडून त्या पुढे ढकलत नेल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पार्किंगस्थळी १० वाहने आगीच्या संकटातून बचावली.