शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कारने दुचाकीस्वारास चिरडले

By admin | Updated: May 29, 2014 23:29 IST

भरधाव कारने एका दुचाकीस्वारास चिरडल्याने एका १५ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सुपर एक्स्प्रेस हायवेवरील मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर गुरुवारी सकाळी १0 वाजता घडली.

संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड : अंजनगाव बारी मार्गावरील घटनाबडनेरा : भरधाव कारने एका दुचाकीस्वारास चिरडल्याने एका १५ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सुपर एक्स्प्रेस हायवेवरील मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर गुरुवारी सकाळी १0 वाजता घडली. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड केली. त्यामुळे  घटनास्थळी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. शेख समीर शेख हबीब (१५) असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर अब्दुल अजीज अब्दुल समीर (३६) हा गंभीर जखमी झाला आहे. दोघेही अंजनगाव बारी येथील रहिवासी आहेत. ते एमएच २७ एम ५७५ क्रमांकाच्या दुचाकीने अंजनगाव बारी येथून जात होते. दरम्यान एमएच १५ ईबी ६५४३ या ऑडी या चारचाकी वाहनाने नागपूरकडे जाताना मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यासमोर गुरुवारी सकाळी जोरदार धडक दिली. या अपघातात १५ वर्षांचा शेख समीर शेख हबीबी जागीच ठार झाला. अब्दुल अजीज याला गंभीर अवस्थेत उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ऑडी वाहनाची तोडफोड केली. दरम्यान तणावसदृश परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. दरम्यान मोठा जमाव या ठिकाणी जमला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बडनेर्‍याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर कडू, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी पोहोचले होते. सदर अपघातातील चालक पदमेश्‍वर युवराज पाटील (२५ रा. नाशिक) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुचाकीस्वार अब्दुल अजीज हा व मृत शेखर समीर कामकाजानिमित्त बडनेर्‍याकडे येत होते. बडनेरा पोलिसांनी चालकाविरुध्द गुन्हा दाखल केलेला आहे. मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरची चौफुली अपघाताचे प्रवणस्थळ झाले आहे.   येथूनच अंजनगाव व पलीकडच्या गावासाठी मोठी वर्दळ असते. त्याचप्रमाणे याच परिसरात ३ ते ४ महाविद्यालये आहेत. या ठिकाणच्या अपघतावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे.  संतप्त जमावाने ऑडी वाहनाची तोडफोड करताना चालकासदेखील मारहाण करण्यात आली. त्याचप्रमाणे घटनास्थळी सर्वप्रथम पोहचणार्‍या बडनेरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी चंदेल व भागडकर यांनादेखील धक्काबुक्कीचा सामना करावा लागला, असे प्रत्यक्षदश्रींनी सांगितले.