शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीवरून येतेय मकर संक्रांत

By admin | Updated: January 14, 2015 22:59 IST

सूर्य मकर राशित प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात. यंदा १५ जानेवारीला मकर संक्रात आली असून हत्ती या मुख्य वाहनावरून तर गाढव या उपवाहनावरून संक्रांतीचे आगमन होत आहे.

सूर्याचे संक्रमण : दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू मोहन राऊत - अमरावतीसूर्य मकर राशित प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात. यंदा १५ जानेवारीला मकर संक्रात आली असून हत्ती या मुख्य वाहनावरून तर गाढव या उपवाहनावरून संक्रांतीचे आगमन होत आहे.पौष महिन्यात येणारा एकमेव सण म्हणजे संक्रांत़ संक्रमण म्हणजे ओलांडून जाणे़ मकर राशीत सूर्याच्या प्रवेशाला मकर संक्रमण असे म्हणतात. संक्रांतीनंतर सूर्य उत्तरेकडे झुकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी देवीने शंकासुराचा नाश केल्याची पुरातन कथा आहे़ शंकासुराचा नाश करणारी देवी म्हणजे संक्रांतीला अनेक हात आहेत. या देवीने गोरोचनाचा टीळा लावला आहे़ ही देवी वयाने प्रौढ असून बसलेली आहे़ सुवासाकरीता तिने बेल घेतला आहे़ तर तीदुध भक्षण करीत आहे़ तिची जाती पशु आहे. वार नाव महोदरी असून नक्षत्र नाव राक्षसी असल्याचे पंचागकर्ते किशोर महाराज शास्त्री यांनी सांगितले़ संक्रांतीला नवीन तांब्याचे भांडे तुपाने आणी तिळाने भरून दान करणे गरजेचे आहे़ सूर्याची प्रतिमा व लोकरी कपडे आणि सवाष्ण महिलांना आवश्यक साहित्य दान केल्याने पुण्यप्राप्ती होते, असेही किशोर महाराज शास्त्री यांनी सांगितले. ही मकर संक्रात पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना वायव्य दिशेस पाहत असल्याचे पंचांगात नमूद केले आहे़