शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांच्या महोत्सवावर नरभक्षक वाघाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 01:20 IST

तिवसा तालुक्यात धुमाकूळ घालत असलेल्या नरभक्षक वाघाची प्रचंड दहशत गुरुवारी पुण्यतिथी पर्वातही जाणवली.

ठळक मुद्देवाघ सहा किलोमीटरवर : शेकडो पालख्या, हजारो गुरुदेवभक्तांची वारी धोक्यात : गुरुकुंज मोझरी परिसरात ध्वनिक्षेपकावरून दिवसभर ‘अलर्ट’

सूरज दहाट/अमित कांडलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा/गुरूकुंज : तिवसा तालुक्यात धुमाकूळ घालत असलेल्या नरभक्षक वाघाची प्रचंड दहशत गुरुवारी पुण्यतिथी पर्वातही जाणवली.कालपर्यंत २५ ते ३० कि.मी. अंतरावर असलेला हा पट्टेदार वाघ राष्ट्रसंतांची कर्मभूमी व पुण्यतिथी महोत्सवाचे प्रमुख स्थळ असलेल्या गुरुकुंज मोझरीपासून अवघ्या सहा कि.मी. अंतरावरील रघुनाथपूरच्या शिवारात आढळून आला. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने गुरुवारी सकाळपासून रघुनाथपूर, अनकवाडी, मालधूर, मोझरी, शिरजगाव परिसराला अलर्टवर ठेवले. सोबतच या परिसरातील शेतशिवारात गेलेल्या शेतमजुरांना कामे सोडून घरी परतायला लावले. रात्रीच्या वेळी कुणीही शेतावर जाऊ नये, असे ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून या भागातील गावांमध्ये प्रशासनाने कळविले आहे.दरम्यान, राष्टÑसंत तुकडोजी महाराजांचा सुवर्ण पुण्यतिथी महोत्सव गुरुकुंज आश्रम येथे सुरू असून, त्या महोत्सवाला उपस्थित राहण्याकरिता राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो पालख्या गुरुमाउलींच्या कर्मभूमीत डेरेदाखल होत असतात. यासाठी बहुतांश पायदळ वारी करण्यावर भर असतो. पण, मागील तीन दिवसांपासून वाघ कुºहा, रघुनाथपूर या भागात आढळून आल्याने पालखी यात्रेकरूंचा प्रवास धोक्यात आला आहे. त्यांनाही सतर्क करणे गरजेचे ठरत आहे.महोत्सवात पाचशेवर पालख्याराष्ट्रसंतांच्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवात यंदा किमान साडेपाचशे ते सहाशे पालख्या दाखल होणार आहेत. गुरुकुंजात येणाºया चारही दिशांनी या पालख्यांचे आगमन मौन श्रद्धांजलीच्या पूर्वसंध्येला अर्थात रविवारी सायंकाळी होईल. याशिवाय पंचक्रोशीतील हजारो गुरुदेवभक्त पायीच गुरुकुंज गाठतात.पुण्यतिथी महोत्सवासाठी शेकडो पालख्या या मार्गाने येतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने उपाययोजना तात्काळ कराव्यात. आम्हीदेखील गुरुदेवभक्तांना याविषयी सूचित केले आहे.- जनार्दनपंत बोथे सरचिटणीसअ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळ

टॅग्स :Tigerवाघ