ग्रामपंचायत निवडणूक : कार्यालयात हेलपाटे, उमेदवारांची तारांबळअमरावती : जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ९१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया सुरु झाली आहे. यंदा पहिल्यांदाच संगणकीकृत पद्धतीने नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने लागू केली आहे. मात्र, या प्रक्रियेविषयी अधिक जागृती आयोगाने केली नाही. त्यामुळे उमेदवारांची तारांबळ उडाली आहे. ग्रामीण, दुर्गम भागात बीएसएनएलची सेवा विस्कळीत असल्याने या प्रक्रियेत बाधा येत आहेत.'आॅनलाईन' प्रक्रियेचा पहिलाच प्रयोग थेट ग्रामपंचायत निवडणुकीत झाल्याने नामांकन अर्ज भरताना उमेदवारांची मोठी तारांबळ उडत आहे. शासनाने सेतू केंद्र व महा ई-सेवा केंद्रातून आॅनलाईन अर्ज भरण्याची सेवा उपलब्ध करुन दिली असली तरी येथील जादा काम व सर्व्हरच्या समस्या तसेच अर्ज भरताना एखादा शब्द चुकल्यास पूर्ण अर्ज नव्याने भरावा लागण्याची किचकट प्रक्रिया असल्याने वेळ लागतो. खासगी नेट कॅफेबाहेरदेखील गर्दीमुळे दोन-दोन तास तिष्ठत बसावे लागतात.ग्रामपंचायतीचे इच्छूक उमेदवार हे कमी शिक्षीत आहे व त्यांना संगणक प्रणालीची अधिक माहिती नसल्याने हा गोंधळ उडत आहे. अर्ज भरताना प्रथम वैयक्तिक माहितीचा १० पानी अर्ज निवडणूक कार्यालयातून आणावा लागतो. त्यावरील पहिल्या पानावरील माहितीपत्र (अर्ज कसा भरावा, लागणारी कागदपत्रे कोणती, आदी माहिती) दुसऱ्या पानावर उमेदवारी अर्ज, तिसऱ्या पानावर सहापर्यंत घोषणापत्र आहेत. त्यात अपत्ये, कराचा भरणा शौचालय असल्याची माहिती, दंड दोषारोप नाही, गुन्हा दाखल नाही, तसेच संपत्ती विवरण पत्र याविषयीची माहिती द्यावयाची आहे. सातव्या पानावर चिन्हाची निवड आहे. ही कागदपत्रे राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर 'डाऊन लोड' करायची आहे. नंतर त्याचे प्रिंटआऊटवर सही करून निवडणूक अधिकाऱ्याला विहित वेळेत सादर करायची आहे. एकतर आयोग या पद्धतीला ‘आॅनलाईन’ म्हणजे नंतरही उमेदवारांची फरफट, अशा दुहेरी कात्रीत उमेदवार सापडले आहे. एकतर या प्रक्रियेचा अवलंब करण्यापूर्वी आयोगाद्वारा निवडणूक असणाऱ्या गावात कार्यशाळा घेऊन नागरिकांना या प्रक्रियेची माहिती देणे गरजेचे होते. अशा इच्छूक उमेदवारांच्या प्रक्रिया आहेत. सध्या तरी आॅनलाईन प्रक्रियेमुळे उमेदवार (प्रतिनिधी)
आॅनलाईन नामांकन प्रक्रियेमुळे उमेदवार घामाघूम
By admin | Updated: July 10, 2015 00:53 IST