शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्रांवर झळकल्या उमेदवारांच्या ‘कुंडल्या’

By admin | Updated: February 22, 2017 00:07 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच महापालिका निवडणूक लढविणाऱ्या एकूण १५७८ उमेदवारांचे इत्यंभूत प्रोफाईल सर्वच मतदानकेंद्रांवर झळकले.

अमरावती : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच महापालिका निवडणूक लढविणाऱ्या एकूण १५७८ उमेदवारांचे इत्यंभूत प्रोफाईल सर्वच मतदानकेंद्रांवर झळकले. निवडणूक विभागाकडे उमेदवारांनी शपथपत्रात सादर केलेला गोषवारा फ्लेक्सव्दारे केंद्राच्या दर्शनी भागात लावला होता. यामुळे मतदान करण्यापूर्वीच मतदारांना उमेदवारांची माहिती उपलब्ध झाली होती.निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच महापालिका आयुक्तांकडे निवडणूक अधिकारीपदाची जबाबदारी दिली आहे. निवडणूक लढणाऱ्या व्यक्ती विविध समाजघटकातील असतात. संबंधित उमेदवारांना शपथपत्राव्दारे त्यांची कौटुंबिक माहिती, शिक्षण, उत्पन्नाचे स्त्रोत, वार्षिक उत्पन्न, गुन्हेगारी पार्श्वभूमी आदी माहिती सादर करणे क्रमप्राप्त आहे. नामनिर्देशन सादर करताना ही माहिती निवडणू निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली जाते. उमेदवारांनी शपथपत्रात दिलेली माहिती यापूर्वी मतदानकेंद्राबाहेर प्रसिद्ध केली जात नव्हती. मात्र, यावेळी पहिल्यांदाच ही माहिती चक्क फ्लेक्सच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय आयोगाने घेतला. मतदानकेंद्रावर मतदानासाठी जाणाऱ्या नागरिकांना ही माहिती केंद्रातील दर्शनी भागातच दिसेल अशा पद्धतीने उपलब्ध करण्याचे आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच महापालिका प्रशासनाने सर्व मतदान केंद्रांबाहेर संबंधित झोनअंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची माहिती प्रसिद्ध केली आहे. यामुळे मतदारांची उमेदवार निवडताना चांगली सोेय झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. उमेदवारांची कोंडीजि.प. आणि पंचायत समिती तसेच मनपा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांपैकी काहींवर फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. संबंधित उमेदवाराच्या नावासमोर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. भावी लोकप्रतिनिधी शैक्षणिकदृष्टया उच्चशिक्षित असावा त्याला सामाजिकतेचे भान असावे व तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा नसावा, अशी ेअपेक्षा बाळगणाऱ्या मतदारांचा ऐनवेळी भ्रमनिसार होऊ नये, यासाठी ही क्लृप्ती अतिशय समपर्क ठरली. यामुळे अनेक उमेदवारांची कोंडी झाली होती.