शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजन समितीची रद्द बैठक पुन्हा होणार

By admin | Updated: September 6, 2014 01:26 IST

मुंबईत मागील महिन्यात २६ आॅगस्ट रोजी होणारी जिल्हा नियोजन समितीची बैठक विरोधकांच्या आक्षेपामुळे ऐनवेळी रद्द करण्याची वेळ पालकमंत्री यांच्यावर ओढावली होती.

अमरावती : मुंबईत मागील महिन्यात २६ आॅगस्ट रोजी होणारी जिल्हा नियोजन समितीची बैठक विरोधकांच्या आक्षेपामुळे ऐनवेळी रद्द करण्याची वेळ पालकमंत्री यांच्यावर ओढावली होती. आता मात्र पुन्हा हिच बैठक रविवारी दुपारी ४ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बोलविण्यात आली आहे. या बैठकीत जनसुविधा योजनेच्या सुमारे ३ कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळावी, यासाठी ऐन सुट्टीच्या दिवशी ही बैठक बोलाविण्यात आल्याने याविषयी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.रविवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विषय सुचीवर १३ जानेवारी रोजी पार पडलेल्या सभेतील कार्यक्रमात मंजुर करणे, याच कार्यक्रमातील अनुपालनावर चर्चा करणे जिल्हा वार्षीक योजना सन २०१३-१४ अंतर्गत माहे मार्च २०१४ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा सर्वसाधारण योजना, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्र (ओटीएसपी) सन २०१४-१५ करीता अर्थ संकल्पीय नियतव्यय व माहे जुलै २०१४ पर्यंत खर्चाचा आढावा, सर्वसाधारण योजना, अनुसुचित जाती उप योजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र (ओटीएसपी) आणि अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयावर चर्चा केली जाणार आहे. मात्र या विषयसुची वरील पहिल्या विषयात कार्यक्रम वाचून कायम केल्यास जनसुविधेच्या व इतर महत्वाच्या कामांना मंजुरी मिळू शकते. कारण जानेवारी महिण्यात नियोजन केलेले विकास कामे विधानसभेच्या निवडणुकीच्या आचार संहितेपूर्वी मार्गी लागावीत, यासाठी काही राजकीय नेते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी पालकमंत्र्यांकडे आग्रही होते, हे विशेष.