शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

वीज कार्यालयात प्रहारचा डेरा

By admin | Updated: November 1, 2014 22:46 IST

अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील विजेच्या समस्या वारंवार पाठपुरावा करूनही सोडविल्या जात नसल्याने शनिवारी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी येथील वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता दिलीप घुगल

अमरावती : अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील विजेच्या समस्या वारंवार पाठपुरावा करूनही सोडविल्या जात नसल्याने शनिवारी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी येथील वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता दिलीप घुगल यांच्या दालनात ठिय्या देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. अचलपूर व चांदूरबाजार या दोन तालुक्यात वीज वितरण कंपनीकडून शेतकरी व नागरिकांची गैरसोय होत आहे या पार्श्वभूमीवर प्रहारने २८ आॅक्टोबर रोजी अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देऊन माधान, घाटलाडकी, आसेगाव येथे ५ एम. व्ही. ए. चे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावे, आसेगाव व करजगाव येथे १३२ केव्हीचे नवीन सबस्टेशन त्वरीत सुरू करावे, हिरुळपूर्णा, हरम, मेघनाथपूर, सुलतानपूर येथे इन्फ्रा २ मध्ये ३३ केव्हीचे सबस्टेशन सुरू करावे. अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील २०० विद्युत डीपी जळाल्या असून त्या त्वरीत बदलण्यात याव्या, मंजूर झालेल्या नवीन डीपीची कामे त्वरीत सुरू करावी, विद्युत डीपीचे ट्रान्सफॉर्मर ६३ ऐवजी १०० ट्रान्समिटरचे बसविण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. १ नोव्हेंबरपर्यंत यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली असताना वीज कंपनीने यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने शनिवारी प्रहार कार्यकर्त्यांनी अधीक्षक अभियंता दिलीप घुगल यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करीत या मागण्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी कार्यालयात फटाके फोडूनही आपला संताप व्यक्त केला. दरम्यान प्रहारच्या मागणीबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. आंदोलनात मंगेश देशमुख, राजेश वाटाणे, सुरेश गणेशकर, बाळासाहेब वाकोडे, राजेश सोलव, भास्कर सांयदे शिवा भुयार, अजय तायडे, गजानन ठाकरे, एकनाथ अवसरमोल, संतोष किटुकले भगवंत दामेधर, संजय झिंगरे, अजय राऊत, सुरेश भेंडे, सतीश राऊत अरूण गणथडे याशिम कुरेशी, नामदेव सावरकर आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)