गुन्हे दाखल : मोहिमेत ३४ जनावरे बंदीस्तअमरावती : महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने २१ जुलै ते ३१ जुलैपर्यंत जनावरे पकडण्याची मोहिम हाती घेतली आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार संपूर्ण शहरामध्ये मोकाट जनावरे पकडण्याची कारवाईला इर्विन चौकातून सुरुवात करण्यात आली., जयस्तंभ चौक, वसंत टॉकीज, मालवीय चौक, मांगीलाल प्लॉट, मोर्शी रोड, विलासनगर रोड, रुख्मिणीनगर भागात कार्यवाही केली. कार्यवाहीदरम्यान पशुवैद्यकीय विभाग प्रमुख सचिन बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यवाही करण्यात आली. पशुवैद्यकीय विभागाचे प्र. पशुधन निरीक्षक गुणसागर गवई, अब्दुल रफीक अब्दुल कदीर, रूपेश वानखडे, बजरंग लोखंडे, प्रफुल लोखंडे, बाप्पू चंद्रमनी गवई इत्यादी कर्मचारी हजर होते व यांनी कोणतेही माघार न घेता २० जनावरे कोंडवाड्यामध्ये बंदीस्त केली. आयुक्त यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १४२, १४३, १४४, १४५, कलम २३३, कलम ३७६ व कलम ३७६ (अ), कलम ३८२, ३८६ प्रकरण १४ चे कलम २२, २३, २४ नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले. मोकाट फिरणारे जनावरांचे पशुपालकांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ९० (अ), कलम ९९, कलम १०० प्रमाणे गुन्हा दाखल नोंदवून कारवाईचे निर्देश दिले.
मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम युद्धस्तरावर
By admin | Updated: July 25, 2016 00:19 IST