शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कॅल्शियम कार्बाईडने पिकविला जातोय फळांचा राजा

By admin | Updated: May 29, 2014 23:31 IST

उन्हाळामध्ये आंब्याचा रस घराघरांत मोठय़ा आवडीने करण्यात येत असला तरी फळांचा राजा (आंबा) सद्यस्थितीत आरोग्यासाठी मोठा घातक ठरत आहे. जिल्ह्यात आंबे पिकविण्यासाठी सर्रास कॅल्शियम कार्बाईडचा

अमरावती : उन्हाळामध्ये आंब्याचा रस घराघरांत मोठय़ा आवडीने करण्यात येत असला तरी फळांचा राजा (आंबा) सद्यस्थितीत आरोग्यासाठी मोठा घातक ठरत आहे. जिल्ह्यात आंबे पिकविण्यासाठी सर्रास कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्यात येत असून, त्याला पिवळा रंग येण्यासाठी रासायनिक घटकांचा वापर होत असल्याने मानवाच्या किडनी आणि यकृतावर त्याचे वाईट परिणाम होत आहे.जिल्ह्यात आंब्याची मोठय़ा प्रमाणात विक्री सुरू असून, सद्यस्थितीत हा आंबा आंध्र प्रदेश व कर्नाटकातून आयात केला जात आहे. जिल्ह्यातील आंब्याची वाढती मागणी लक्षात घेता दर तिसर्‍या दिवशी तब्बल ८ ते १0 ट्रक आंबा आयात करण्यात येतो. आयात केलेले हे आंबे पिकविण्यासाठी सर्रास कॅल्शियम कार्बाईडचा वापर होत आहे. कॅल्शियम कार्बाइडमध्ये फॉस्फरस आणि अर्सेनिक हे रासायनिक घटक असून, ही दोन्ही घटक किडनी आणि यकृतावर गंभीर परिणाम करतात. यासोबतच आंब्यातील रसाला पिवळा रंग आणण्यासाठी गॅसचा वापर करण्यात येत असून, त्यामुळे आंबा सडण्याची प्रक्रिया काही काळ लांबते. आंब्यावर करण्यात येत असलेली ही रासायनिक प्रक्रिया मोठी जीवघेणी असून आपण मोठय़ा चवीने खाण्यासाठी वापरत असलेला आंबा सध्यातरी आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. उन्हाळ्यामधील तीन ते चार महिनेच उपलब्ध होणारा आंबा मागील काही वर्षांपासून तब्बल सहा ते आठ महिने मिळत आहे. या आंब्यांवर विविध प्रक्रिया तसेच निर्जंतूक करून तो बराच काळ खाण्यायोग्य ठेवून वापरण्यात येत आहे. मात्र रासायनिक घटकांचा वापर करून पिकविणे आणि ते सडू नये, यासाठी करण्यात येत असलेली प्रक्रिया मानवाच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे.