शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती सभेत कॅफोंना शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:14 IST

जिल्हा परिषदेला विविध विकासकामे, योजना आणि वेतनाचे सुमारे १६० कोटी रुपये जिल्हा बँकेतून काढून परस्परच वित्त विभागाने राष्ट्रीयीकृत बँकेत एफडी केली. या मुद्द्यावर गुरुवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी रवींद्र येवले यांना खडे बोल सुनावत कोंडीत पकडले. व्याजदर तफावतीमुळे होणारे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचे नुकसान कोण भरून देणार, असा जाब विचारला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : १६० कोटींचा ठेवीचा वाद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेला विविध विकासकामे, योजना आणि वेतनाचे सुमारे १६० कोटी रुपये जिल्हा बँकेतून काढून परस्परच वित्त विभागाने राष्ट्रीयीकृत बँकेत एफडी केली. या मुद्द्यावर गुरुवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी रवींद्र येवले यांना खडे बोल सुनावत कोंडीत पकडले. व्याजदर तफावतीमुळे होणारे जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचे नुकसान कोण भरून देणार, असा जाब विचारला.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. त्यामुळे कित्येक वर्षांपासून जिल्हा परिषदेला विकासकामे, योजना आणि वेतनासाठी आर्थिक वर्षात प्राप्त होणारा शासनाचा कोट्यवधीचा निधी आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेव म्हणून ठेवला जात आहे. जिल्हा परिषदेचे सर्व आर्थिक व्यवहार सुरू असताना काही दिवसांपूर्वी पदाधिकाºयांना अंधारात ठेवून झेडपीच्या वित्त विभागाने सीईओंचा आदेश पुढे करीत जवळपास १६० कोटींची रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत वळती केली. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेतील २५ कोटी व एसबीआयमधील ७५ कोटी तसेच इतर निधीचा समावेश आहे. जिल्हा बँकेचा सर्वाधिक व्याजदर असताना, तुलनेने कमी व्याज देणाºया राष्ट्रीयीकृत बँकेत कुणाला विचारून एफडी केली आणि यात वित्त व लेखा अधिकारी रवींद्र येवले यांचा हेतू काय, असा बबलू देशमुख यांनी समाचार घेतला. वित्त विभागाच्या एकतर्फी निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या सेस फंडात जमा होणाºया रकमेवरील व्याजाचे नुकसान होत आहे. त्यामुळे कॅफोंवर कारवाईची मागणी त्यांनी सभागृहात केली. यावर सदर एफडी सीईओंच्या आदेशाने झाल्याचे कॅफोंनी पुष्टी केली. कसबेगव्हाण येथील मागास वस्तीच्या कामाचा दर्जा निकृष्ट आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देऊनही अहवाल का दिला नाही, असा मुद्दा सदस्यांनी मांडला. यासंदर्भात पाच दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश अध्यक्षांनी दिले.सिंचन, शिक्षण, आरोग्य, पंचायत विभागाच्या मुद्द्यांवरही बबलू देशमुख, सुहासिनी ढेपे, बाळासाहेब हिंगणीकर, प्रियंका दगडकर, अभिजित बोके, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. सभेला अध्यक्ष नितीन गोंडाणे, वनिता पाल, सुशीला कुकडे, अ‍ॅडिशनल सीईओ विनय ठमके, डेप्युटी सीईओ नारायण सानप, दिलीप मानकर, माया वानखडे, प्रशांत थोरात, विजय राहाटे, शिक्षणाधिकारी आर.डी. तुरणकर, कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर व खातेप्रमुख उपस्थित होते.पाच कोटींची कामे मार्गी; मग इतर का नाहीत?जिल्हा परिषद बांधकाम विभागाला १५ डिसेंबर रोजी शासनाकडून पाच कोटी रुपये आले आणि या निधीतील सर्व कामांचे अंदाजपत्रक, निविदा व इतर प्रशासकीय सोपस्कार १० दिवसांत पूर्ण करू न मार्गी लावलीत. मग ३०-५४ आणि ५०-५४ या लेखाशीर्षातील कामे मंजूर असताना मागील तीन महिन्यांपासून या कामांचे अंदाजपत्रक, निविदा व अन्य प्रशासकीय कार्यवाही संबंधित विभागाने का केली नाही, असा प्रश्न बबलू देशमुख यांनी सभेत मांडला. यासोबतच २५-१५ या लेखाशीर्षातील कामेही प्रशासनाने निकाली काढले नाही. प्रशासनाच्या टोलवाटोलवीमुळे पदाधिकारी व सदस्य आक्रमक झाले. पाच कोटींची कामे मार्गी लावल्याप्रकरणी चौकशी करण्याची सूचना सभापती जयंत देशमुख यांनी केली. ती अध्यक्षांनी मान्य केली.