प्रवीण पोटे : मालकीविना जमीन विक्रीअमरावती : तक्रारकर्त्यांनी भूखंड खरेदी करून २८ वर्षे लोटलीत. आजतागायत एकदाही त्यांनी याप्रकरणी का सवाल उपस्थित केला नाही, असा जाब विचारून आरोपकर्त्यांच्या खरेदी बोगस असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली. माझा जमीन खरेदी व्यवहार पूर्णत: कायदेसंगत आहे. तक्रारकर्त्यांच्या खरेदीशी माझा दुरान्वयानेही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.तक्रारकर्त्यांच्या निवेदनानुसार, अग्रवाल आणि देऊळगावकर हे लेआऊट पार्टनर आहेत. कसे होणार फेरफार?अमरावती : सदर लेआऊटमधून केल्या जाणाऱ्या भूखंड विक्रीपत्रावर दोघांच्याही स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. परंतु विक्रीपत्रावर केवळ देऊळगावकर यांची सही आहे. आश्चर्य असे की, भुखंड विक्री करून देणाऱ्या याच देऊळगावकरांचे नाव सात बारा उताऱ्यात मात्र नाही. ज्यांचे सातबारा उताऱ्यात नावच नाही त्यांची जमिनीची मालकी कशी? आणि ज्यांची जमिनीची मालकीच नाही त्यांना जमीन विक्रीचे अधिकार कसे? आरोपकर्त्यांजवळ असलेली विक्रीपत्रे अशी जमिनीचे मालक नसलेल्यांच्या स्वाक्षरीची आहेत, म्हणूनच ती बोगस आहेत, असा खुलासा पोटे यांनी केला. तक्रारकर्त्या आठ लोकांच्या खरेदीपत्रावर नोंद असलेले शेताचे क्षेत्रफळ वेगवेगळे आहे. कुठे ते १४ तर कुठे ७ एकर नोंदविले आहे. एकच शेत वेगवेगळ्या क्षेत्रफळाचे कसे? सर्वच आठही खरेदींमध्ये दर्शविण्यात आलेल्या चतु:सीमा विसंगत आहेत. खरेदीपत्रातील हे उल्लेखदेखील खरेदी बोगस असल्याचे सिद्ध करण्यास पुरेसे ठरतात. (प्रतिनिधी)फेरफार कसे होणार?सातबारा उताऱ्यावर मूळ मालकाच्या नावाची नोंद असल्याशिवाय पटवारी भूखंडाचे फेरफारच करीत नाही. या प्रकरणी नेमके तेच घडले. तक्रारकर्त्यांच्या भूखंडाचे फेरफार त्यामुळेच होऊ शकले नाही. सर्व्हे क्रमांक ५७(१)माझ्या खरेदीवर पूर्वीवासूनच सर्व्हे क्रमांकाचा ५७(१) असा उल्लेख आहे. पुढे राठी, गावंडे, बघराईत, झुनझुनवाला आदींना जमीन विक्री होतानाही हाच क्रमांक कायम असल्याचे पोटे म्हणाले.
तक्रारकर्त्यांच्या खरेदीच बोगस
By admin | Updated: May 28, 2016 00:03 IST