शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तीनचाकी कटल्यात भंगार खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:11 IST

फोटो पी २७ अनिल कडू परतवाडा : कोरोनाकाळात काही व्यवसायांचे स्वरूप बदलत चालले आहे. हाथ रिक्षा आणि सायकलवरील भंगारवाला ...

फोटो पी २७ अनिल कडू

परतवाडा : कोरोनाकाळात काही व्यवसायांचे स्वरूप बदलत चालले आहे. हाथ रिक्षा आणि सायकलवरील भंगारवाला आता ऑटोरिक्षारुपी तीनचाकी कटल्यात भंगार खरेदी करू लागला आहे.

या कटल्यावर अगदी कचरा गाड्याप्रमाणे साऊंड सिस्टिम कार्यरत आहे. स्वच्छ भारत मिशन प्रमाणेच या साऊंड सिस्टीम मधून आला आला भंगारवाला आला. भंगार आणा पैसे घेऊन जा, प्लास्टिक द्या, लोखंड द्या, पेपर रद्दी द्या, घरातला कचरा कमी करा. पैसे घेऊन जा, आम्ही केवळ पैशानेच भंगार खरेदी करतो. असा सतत उद्घोष सुरू असतो. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेतून सुरू राहणारा हा उद्घोष कोरोना काळात लक्षवेधक ठरला आहे.

हा भंगार खरेदी करण्याचा लक्षवेधक प्रयत्न अचलपूर शहरातील शेख अफजल या युवकाने चालविला आहे. त्याकरिता त्याने एम एच २९ ए एन ०५५२ क्रमांकाचा पिवळ्या रंगाचा एक जुना कटला विकत घेतला असून, त्यावर त्याने साऊंड सिस्टिमही बसविली आहे. अचलपूर नगरपालिका क्षेत्रात तो घरोघरी जाऊन मोहल्ला मोहल्ल्यात जाऊन या कटल्यात भंगार खरेदी करीत आहे. या खरेदीत त्याचा आत्मविश्वासही दांडगा आहे.

हात रिक्षात भंगार खरेदी करणारे अचलपूर शहरातील कासदपुरा येथील शेख कलीम हा घरोघरी जाऊन भंगार खरेदी करणारे ३५ लोक अचलपूर नगरपालिका क्षेत्रात आहेत. अचलपूर शहरातीलच मंडळी परतवाड्यात भंगार खरेदी करतात. भंगारात घेतलेले लोखंड हे जालना येथे पाठविले जाते. प्लास्टिक नागपूरला पाठविले जातात. रद्दी शहरातच विकली जाते. दिवसभर शहरात भटकंती करून मिळणाऱ्या दोनशे-अडीचशे रुपयांच्या मजुरीतून आमच्या कुटुंबाला हात भार लागतो, असे ते म्हणाले.

(फोटो--कटला/ऑटो) दि.27/5/21