ऑनलाईन लोकमतअमरावती : जयस्तंभ चौक ते सरोज चौकात रस्त्याच्या एका बाजूचे काँक्रीटीकरण पाच महिन्यानंतर झाले. त्यामुळे व्यावसायिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र, आता नाली खोदकामामुळे पुन्हा व्यवसाय ठप्प झाला आहे.काँक्रीटीकरण रस्त्यालगत मोठी नाली मजीप्राकडून खोदण्यात आल्याने ग्राहकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत असल्याने ५० टक्के व्यवसाय ठप्प झाला आहे. एकीएकडे रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. दुसरीकडे याच रस्त्यांच्या कामामुळे या परिसरात मंदीचे सावट आहे. गेल्या पाच महिन्यांत येथे रस्त्याचे काम करण्यात आले. हे कामे सुरू असल्याने वाहनांना या भागात प्रवेशबंदीच आहे. यामुळे अनेक व्यवसायिकांचे व्यवहार ठप्प पडले आहेत. आता नालीचे खोदकाम करण्यात आले आहे. ते खोल असल्याने व काम मंदगतीने करण्यात येत आहे. लोकांच्या रोजीरोटीवर गदा आणणारा हाच का विकास, असा सवाल येथील व्यावसायिक विचारत आहेत. कामांचे कुठलेही नियोजन नाही. यासंदर्भाची तक्रार मुख्यमंत्री व पंतप्रधानांच्या शासकीय पोर्टलवर करण्यात आली आहे. व्यवसायाचे मोठे नुकसान सहन करीत असल्याचे व्यावसायिक संदीप गोडबोले म्हणाले.
खोदकामामुळे व्यवसाय ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 01:04 IST
जयस्तंभ चौक ते सरोज चौकात रस्त्याच्या एका बाजूचे काँक्रीटीकरण पाच महिन्यानंतर झाले. त्यामुळे व्यावसायिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता.
खोदकामामुळे व्यवसाय ठप्प
ठळक मुद्देसरोज चौकात काँक्रीटीकरण : रस्त्या कामाला पाच महिने, आता नालीचे काम मंदगतीने