शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

व्यापारी संघटनांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:23 IST

देशातील आॅनलाइन शॉपिंगच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. व्यापारक्षेत्रात नव्याने उतरणाऱ्या विदेशी कंपन्यांना अटकाव करण्याच्या मागणीसाठी २८ सप्टेंबर रोजी कडकडीत बंद पाळला. कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सच्या नेतृत्वातील विविध व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठवून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.

ठळक मुद्देसरकारच्या धोरणाचा निषेध : आॅनलाईन मार्के टिंगला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशातील आॅनलाइन शॉपिंगच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. व्यापारक्षेत्रात नव्याने उतरणाऱ्या विदेशी कंपन्यांना अटकाव करण्याच्या मागणीसाठी २८ सप्टेंबर रोजी कडकडीत बंद पाळला. कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सच्या नेतृत्वातील विविध व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठवून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.चिल्लर व्यापार व ई कॉमर्समध्ये विदेशी गुंतवणुकीला परवानगी देवू नये, सिंगल बॅ्रन्ड रिटेलमध्ये शंभर टक्के परवानगी परत घेण्यात यावी, जीएसटीमध्ये केवळ दोन प्रकारचे करदर ठेवण्यात यावे, जीएसटी नोंदणीबध्द व्यापाºयांना उत्तरप्रदेशच्या धर्तीवर दहा लाख रुपयांचा अपघात विमा, देशात बाजारशुल्क बंद करावा, आयात करामधील सवलतीची मर्यादा पाच लाख करण्यात यावी, कलम ८० सी.के. अंतर्गत सवलतीची मर्यादा १.५ वरून २.५ लाख करण्यात यावी, अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत कमाल दंड दहा हजार असावा, दगड व लाकडावर वनविभागामार्फत लावण्यात येणारा कर रद्द करावा, व्यापाºयांना कमी व्याजदरात कर्जपुरवठा, कलम ४११ व ४१२ मध्ये असलेली अटकेची तरतूद रद्द करावी, आॅनलाइन फार्मासीवर प्रतिबंध आदी मागण्यांसाठी व्यापारी संघटनांनी बंद पुकारला होता. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधानाना निवेदन पाठवून न्याय देण्याची मागणी विविध व्यापारी संघटनांनी केली.यावेळी कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष बी.सी. भरतीया, श्माम शर्मा, बवन भुतडा, आत्माराम पुरसवाणी, सुरेश जैन, घनश्याम राठी, जयंत कामदार, प्रकाश बोके, सुरेश बतरा, परशराम अग्रवाल, सुरेश बतरा, सचिन जोशी, माणिकचंद लुल्ला, गौरीशंकर हेडा अतुल कळमकर, महेश खासबागे, अशोक तिवलकर, राजेश चावंडे, पंकज वस्ताणी, संतोष मालवीय, सुरेश खटलोया, अनिल देवलसी, अमित अग्रवाल यांच्यासह विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.ई-फार्मसीच्या निषेधार्थ औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंदकेंद्र सरकारने इंटनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री व ई- फॉर्मासी धोरणाच्या विरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी शुक्रवारी बंद पुकारला होता. अमरावती शहर व जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळला. जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशने जिल्हाधिकारी, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त आदींना मागणीचे निवेदन दिले. यात केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सौरभ मालाणी, सचिव प्रमोद भरतीया, उपाध्यक्ष संजय शेवळे व पदाधिकारी व अन्य सहभागी झाले होते.