शेंदूरजनाघाट-राजुरा बाजार : शाळा-महाविद्यालयांमध्ये पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांकरिता ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू कराव्या व पास वितरित करण्यात याव्यात, अशी मागणी वरूड तालुका महिला काँग्रेसने एसटी महामंडळाचे व्यवस्थापक जीवन वानखडे यांच्याकडे केली आहे.
निवेदन देताना तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष कोमल पांडव, महिला शहर अध्यक्ष सविता काळे, तालुका महिला सेवादल अध्यक्ष रंजना म्हस्की, जिल्हा सेवादलाचे सरचिटणीस सुधाकरराव दोड, सेवादल तालुकाध्यक्ष नरेंद्र पावडे, युवक काँग्रेस अध्यक्ष मनोज इंगोले, प्रदीप पवार, स्वप्निल खांडेकर, खरेदी-विक्री संघाचे संचालक कैलास वानखडे, मुकेश देशमुख, अंकुश भाकरे उपस्थित होते. तालुक्यातील शाळा-विद्यालयांमध्ये कुठून, किती विद्यार्थी येतात, याची माहिती पत्र देऊन मागितली आहे. मात्र, ती प्राप्त झाली नाही. आता १ जानेवारीपासून काही फेऱ्या सुरू करू व पास वितरित करू, असे आश्वासन वानखडे यांनी कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले.