शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
2
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
3
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
4
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
5
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
6
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
7
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
8
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
9
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
10
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
11
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
13
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
14
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
15
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
16
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
17
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
18
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
19
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
20
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट

दुप्पट्टा टाकून केले जाते बसमध्ये आरक्षण

By admin | Updated: February 9, 2017 00:15 IST

जिल्हयातील सर्व आगारात व बसस्थानकात बस आली की, दुप्पट्टा टाकून नियमबाह्य आरक्षण करण्याची पद्धत आहे. त्यामुळे कुठल्याही बसवर प्रवाशांची झुंबड उडते.

अपघात होण्याची शक्यता : चालक- वाहकांची मूक संमतीसंदीप मानकर अमरावतीजिल्हयातील सर्व आगारात व बसस्थानकात बस आली की, दुप्पट्टा टाकून नियमबाह्य आरक्षण करण्याची पद्धत आहे. त्यामुळे कुठल्याही बसवर प्रवाशांची झुंबड उडते. दुप्पट्टा टाकून सिटचे आरक्षण केले जाते. यामुळे अनेकदा किरकोळ जखमी झाल्याच्याही घटना आहे. या प्रकारामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चालक - वाहकांच्या डोळयासमोर हा प्रकार होतो. पण चालक -वाहक नागरिकांना हटकण्याचीही तसदी घेताना दिसून येत नाही. अमरावती जिल्हयात ४५० च्यावर एसटी बसेस आहेत. त्याच्या हजारो फेऱ्या रोज अमरावती आगारातून होतात. त्यामुळे अमरावती आगारात रोज प्रवाश्यांचे यात्रेचे स्वरुप राहते. पण मात्र शिस्तीत नागरिक बसमध्ये चढत नाहीत. आपल्या बसमध्ये जागा मिळाली पाहिजे याकरीत, काही तरुण वर्ग तसेच महिला सुध्दा दुप्पट्टा टाकून सिटीचे आरक्षण करतात. त्यामुळे अनेक वृद्धांना बसमध्ये उभे राहण्याची वेळ येते. अनेक जण आपल्या जवळ असलेली बॅग व इतर साहित्य टाकू न आरक्षण करतात. अनेकांना नियमात चढूनही जागा मिळत नसल्याने त्यांची अनेकांशी वाद होतात. बसमध्ये सीटच्या मागे एसटी महामंडाच्या वतीने लिहलेले असते. की महिलांकरीता राखीव, अपंग, वृध्दांकरीता, माजी सैनिकांकरीता राखीव असे लिहलेले असते. पण हे आरक्षण फक्त नावापुरतेच राहले आहे. याची अंमलबजावणीही होत नाही. व अश्या लोकांना आपल्या अधिकारांची जाणीवही नसते. प्रवाशी दुप्पट्टा व ईतर साहित्य टाकून आरक्षण करतात हे नियमबाह्य आहे. यावर जिल्हा नियंत्रकांनी कारवार्इंचे आदेश दिले तर अश्या प्रकाराला आळा बसू शकते. पण अश्या प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे अधिकारी करतात तरी काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो. रांगेत शिस्तीत बसमध्ये चढणे अपेक्षित आहे. पण नागरिकांनी स्वयंभू पध्दती पाडल्या आहेत. परंतु इतर प्रवाश्यांना याचा त्रास सहन करावा सहन करावा लागतो.