शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

वडनेरकर वाडीत घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:10 IST

अमरावती : बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील वडनेरकर वाडीत गुरुवारी चोरीची घटना उघडकीस आली. चोरांनी कृषी सहायकांच्या घराचे कुलूप तोडून १० ...

अमरावती : बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील वडनेरकर वाडीत गुरुवारी चोरीची घटना उघडकीस आली. चोरांनी कृषी सहायकांच्या घराचे कुलूप तोडून १० हजार रुपये रोख लंपास केली. दीपक प्रकाश पांडे (३५ रा. वडनेरकरवाडी) हे दर्यापूर येथील कृषी विभागात कार्यरत आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता त्यांचे कुटुंबीय घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान चोरांनी घराचे कुलुप तोडून आलमारीतील १० हजारांची रोख लंपास केली. दीपक पांडे यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदविला.

-------------------------------------------------

दारुच्या बॉटलीचा काच मारून केले जखमी

अमरावती : दारूसाठी पैसे न दिल्याने एका इसमाला बॉटलीचा काच मारून जखमी करण्यात आले. ही घटना गुरुवारी नवसारी परिसरात घडली. संतोष रामदेव चक्रे (४७ रा. नवसारी) हे घराबाहेर उभे असताना, त्यांना प्रकाश भीमराव चक्रे (रा. नवसारी) यांनी दारू पिण्यासाठी २० रुपये मागितले. या कारणावरून प्रकाशने दारूच्या बॉटलीने संतोषवर वार केले. तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी प्रकाश चक्रेविरुध्द गुन्हा नोंदविला.

-----------------------------------------------

राठीनगरातून दुचाकी लंपास

अमरावती : राठीनगरातील जय माता दी मंदिर परिसरातून एमएच २७ बीजे ५०३६ दुचाकी अज्ञाताने लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. शंकर नानाजी नागपुरे (५५ रा. एकवीरा विद्युतनगर) त्यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.