लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात एकापाठोपाठ घडलेल्या धक्कादायक घटनांमुळे अमरावतीकर भयभित झाले असताना सोमवारी सकाळी शारदानगरात घरफोडीची घटना उघडकीस आली. चोरांनी एका वकिलाच्या घरातून सुमारे ३० लाखांचा ऐवज लंपास केल्याने खळबळ उडाली. शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिक दहशतीत असून, अशा घटनांमुळे गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.शारदानगरातील धान्य व्यवसायी नीलेश नारायण टावरी (४६) व त्यांचे वडील नारायण वकिली व्यवसायात आहेत. शारदानगरात नीलेश, त्यांचे वडील नारायण, आई चंद्रकला, नीलेश यांची पत्नी कल्पना व मुलगा शुभम असे पाच जण एका घरात राहतात. रविवारी टावरी कुटुंबीय देवदर्शनासाठी मध्यप्रदेशातील जामसावली येथे गेले होते. दरम्यान शेजारच्या शीतल कोठारी यांनी भ्रमणध्वनीद्वारे तुमच्या घराची दारे उघडी असल्याची माहिती दिली. त्यामुळे टावरी कुटुंबीय सोमवारी सकाळी घरी परतले. त्यांना दाराच्या कुलुपाचा कडीकोंडा तुटलेला दिसला. वरच्या मजल्यावरील दाराचा कोंडा वाकलेला दिसला. घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त आढळून आले. त्यांनी तिजोरीची पाहणी केली असता, सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा सर्व ऐवज चोरून नेल्याचे निदर्शनास आले. टावरी कुटुंबीयांनी घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. श्वान व ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला. या प्रकरणात नीलेश टावरी यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला. चोरी गेलेल्या सोन्याची पावतीनुसार जुनेच दर पोलिसांनी लक्षात घेतले, हे विशेषउघड्या घरातून १ लाख १४ हजारांचा ऐवज लंपासकाही दिवसांपासून शहरात पु्न्हा घरफोडीचे सत्र सुरू झाले आहे. गुरुदेव नगरातील रहिवासी महिलेच्या उघड्या घरातून चोरांनी १ लाख १४ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. तक्रारकर्ता महिला घरातील शेवटच्या खोलीत बसली होती. त्यांची नात बाहेरून घरात धावत आली. एक लाल सदरा परिधान केलेला इसम घरातून बाहेर गेल्याचे तिने आजीला सांगितले. त्यामुळे आजीने घरातील साहित्यांची पाहणी केली असता, चोराने देवाजवळ ठेवलेले सोन्याचे दागिने व ४ हजारांची रोख असा एकूण १ लाख १४ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची तक्रार गाडगेनगर पोलिसात केली आहे.पोलिसांसमोर आव्हानघरफोडीच्या घटनेच्या माहितीवरून पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्त शशीकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त बळीराम डाखोरे, पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ तपासाची सूत्रे हलविले. रविवारी असीस कॉलनीजवळ घडलेल्या जबरी चोरी व हत्येच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी ही मोठी घरफोडीची घटना शहरात घडल्याने पोलिसांचे चांगलेच काम वाढले. हत्येच्या घटनेचा उलगडा अद्याप झाला नसताना शारदानगरातील मोठ्या घरफोडीचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.फेसवॉशने धुतले तोंड, गुटखा खाऊन थुंकले घरातरविवारी मध्यरात्रीनंतर पहाटे दरम्यान टावरी यांच्या घरात चोरी झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी घरातील प्रत्येक आलमारी व साहित्य हुडकून पाहिले. आलमारीच्या चाव्या शोधल्या आणि चावीने आलमारी उघडून दागिने व रोख रक्कम चोरून नेली. प्रत्येक साडी उकलून पाहिली, प्लास्टिक डब्बे उघडून त्यातील सोन्या-चांदीचे सिक्के काढले नि प्लास्टिक डब्बे तेथेच फेकून दिले. चोरांनी सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले, तर आर्टीफिशियल दागिन्यांचे निरीक्षण करून ते तेथेच फेकून दिले. चोरांनी बेसीनमधील फेसवॉशने तोंड धुतल्यानंतर फेसवॉशची बॉटल खाली आणून फेकली. इतकेच नव्हे, तर एलसीडीजवळील व पायºयातील कोपºयात गुटखा खाऊन थुंकले.सीसीटीव्हीची तपासणीशारदानगरात लब्धप्रतिष्ठित राहतात. तेथील बहुतांश नागरिकांच्या घरात सीसीटीव्ही नाहीत. एका घरातील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी तपासले असता, त्यात काही सुगावा लागला नाही. त्यामुळे अन्य ठिकाणच्या सीसीटीव्हीची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे.हा मुद्देमाल लंपासटावरी यांच्या तक्रारीत दिल्यानुसार त्यांच्या घरातून ८०० ग्रॅमचे सोन्याचे दागिने, ७ किलो चांदीचे दागिने व भांडे, १ लाख ३० हजारांची रोख व एक मोपेड वाहन चोरी गेल्याचे निदर्शनास आले आहे.
घरफोडी : अर्धा किलो सोने, सात किलो चांदी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 23:06 IST
शहरात एकापाठोपाठ घडलेल्या धक्कादायक घटनांमुळे अमरावतीकर भयभित झाले असताना सोमवारी सकाळी शारदानगरात घरफोडीची घटना उघडकीस आली. चोरांनी एका वकिलाच्या घरातून सुमारे ३० लाखांचा ऐवज लंपास केल्याने खळबळ उडाली. शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिक दहशतीत असून, अशा घटनांमुळे गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.
घरफोडी : अर्धा किलो सोने, सात किलो चांदी लंपास
ठळक मुद्देनागरिकांमध्ये दहशत : गुन्हेगारीवरील पोलिसांचा वचक संपला?