शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 Suspended : IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
2
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले
3
“भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार, पाकने व्हिक्टिम कार्ड खेळू नये”; अमेरिकेने सुनावले
4
Operation Sindoor Live Updates: IPL सामने रद्द होण्याची शक्यता, BCCI घेणार निर्णय
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का! BSF ने जैशच्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला; सांबामधून घुसखोरीच्या प्रयत्नात होते
6
'ऑपरेशन सिंदूर'वरील प्रत्येक अपडेट देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं आहे बॉलिवूड कनेक्शन, जाणून घ्या याबद्दल
7
“१५ मिनिटे सत्ता द्या, पाकिस्तानला कसे नेस्तनाबूत करायचे ते दाखवून देऊ”; AIMIM नेते आक्रमक
8
पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष
9
पहलगाम हल्ल्यानंतर या दिग्गज कंपनीचे ₹१९००० कोटी बुडाले, चालवते देशातील नंबर १ कंपनी
10
"देशात परिस्थिती काय अन् हा बावळट...", किंग कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला सुनावलं
11
हाय अलर्ट! चंदीगड-अंबालामध्ये पुन्हा वाजले सायरन, नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना
12
'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा
13
आधारमधील तुमचा मोबाईल नंबर ऑनलाइन कसा बदलायचा? घरबसल्या २ मिनिटांत होईल काम
14
India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?
15
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
16
२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला
17
सीमेपासून समुद्रापर्यंत... भारताचे नियोजन पाहून पाकिस्तानला भरली धडकी!
18
"शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली...", मधुगंधा कुलकर्णीची देशभक्तीवरील पोस्ट चर्चेत
19
"माझी गरज लागली तर मी बॉर्डरवर जाऊन युद्ध लढण्यासाठी तयार", प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
20
Video: ब्लॅकआऊट वेळी लाईट बंद न करणाऱ्या दुकानदारावर भडकले आजोबा; टाळक्यात हाणली काठी

चौकीत नोंद न करता परस्पर ठेवला जातो मृतदेह

By admin | Updated: December 15, 2015 00:29 IST

इर्विन पोलीस चौकीत नोंद न करता काही पोलीस कर्मचारी परस्पर मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवत असल्यामुळे ...

पोलिसांचा कारभार : माहिती घेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांची पायपीट अमरावती : इर्विन पोलीस चौकीत नोंद न करता काही पोलीस कर्मचारी परस्पर मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवत असल्यामुळे नातेवाईकांना माहिती मिळविण्यासाठी पायपीट करावी लागते. यामुळे इर्विन चौकीतील पोलिसांसह मृताचे नातेवाईकसुध्दा त्रस्त झाले आहेत.जिल्ह्यात दररोज अपघात व गुन्हेगारीसंदर्भात घटना घडतात. तसेच काही नागरिकांचे आकस्मिक मृत्यूसुध्दा होतात. अशाप्रसंगी पोलीस घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन तो मृतदेह इर्विन रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणतात. इर्विनमधील डॉक्टर तपासणीनंतर मृत घोषित करतात. मात्र, अनेकदा असेही लक्षात आले की, काही पोलीस कर्मचारी मृतदेहाला परस्पर शवविच्छेदनगृहात ठेवत आहेत. यासंदर्भात इर्विन पोलीस चौकीतील पोलिसांना मृतदेहाविषयी माहिती देण्याचीही तसदी काही पोेलीस घेत नाहीत. इर्विन पोलीस चौकीतील नोंदवहीत नोंद होत नसल्यामुळे मृताचे नातेवाईकांना माहिती मिळणेही कठीण होत आहे. मृताचे नातेवाईक मृताबाबत माहिती घेण्यासाठी इर्विन पोलीस चौकीत जातात. मात्र, नोंदवहीत संबंधित मृताची माहिती नसल्यामुळे मृताच्या नातेवाईकांना पायपीट करीत संबंधित पोलीस ठाण्यातच जावे लागते. काही पोलीस इर्विन चौकीतील नोंदवहीत नोंदी करतात. तर काही जण परस्पर मृतदेह शवविच्छेदन गृहात नेऊन ठेवतात. इर्विनच्या वार्ड क्रमांक ९ मध्ये शवविच्छेदन गृहाच्या कुलुपाची चावी ठेवण्यात येते. तेथील नोंदवहीत पोलीस नोंद करतात. इर्विन चौकीतील नोंदवहीत नोंदी होत नसल्यामुळे हा प्रकार घडत आहे.