शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

वळूचा उच्छाद : तीन जखमी

By admin | Updated: July 30, 2015 00:16 IST

शहरातील मध्यवस्ती असणाऱ्या रुक्मिनी नगर परिसरात बुधवारी सकाळी १० वाजतापासून हिंसक बनलेल्या वळूने मोठा धुमाकूळ घातला.

शूट अ‍ॅट साईटचे आदेश : ट्रँक्युलाझर गन पोहोचलीच नाही, महापालिका पथकाने केले जेरबंदअमरावती : शहरातील मध्यवस्ती असणाऱ्या रुक्मिनी नगर परिसरात बुधवारी सकाळी १० वाजतापासून हिंसक बनलेल्या वळूने मोठा धुमाकूळ घातला. या वळुने एका वृध्दासह ३ नागरिकांना शिंगाने धडका मारुन जखमी केले. या पिसाळलेल्या वळूच्या धास्तीने या परिसरातील नागरिक ६ तास वेठीस धरल्या गेले. अखेर महापालिकेच्या मोकाट गुरे पकडणाऱ्या पथकाने दुपारी ३ च्या सुमारास दोरांच्या सापळ्यात जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. रुक्मिनी नगरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयालगत सकाळी १० च्या सुमारास हा वळू हिंसक बनला. तो मान हलवून व पायाने जमीन उखरत नागरिकांच्या अंगावर धावून जात होता. याच रस्ताने पायदळ येणाऱ्या एका वृध्द इसमाला शिंंगाने फेकून जखमी केले. थोड्या वेळात त्याने दुचाकीवरुन येणाऱ्या दोन नागरिकांना शिंगाने मारुन जखमी केले. महापालिका १९ क्रमांकाच्या शाळेच्या परिसरात पिसाळलेल्या वळूने चांगलाच धुमाकूळ घातला. काही घरांच्या दरवाज्याला व कम्पाऊंडच्या फाटकांना देखील त्याने धडका मारल्या, काही मुलांनी या वळुला दगड मारल्याने वळू आणखी हिंसक बनला. परंतु तोवर याची चर्चा झाल्याने नागरिक सावध झाले. या वळूच्या धुमाकूळाची सूचना फ्रेजरपूरा ठाण्यात व महापालिकेला करण्यात आली. दरम्यान महापालिकेच्या मोकाट गुरे पकडणाऱ्या पथकाने दुपारी २ चे सुमारास या वळूला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने या पथकाच्या वाहनाला धडक देवून पळ काढला. यावेळी या पथकातील एका व्यक्तीला देखील त्याने धडक मारुन जखमी केले. दरम्यान पथक व नागरिकांनी या वळूची कोंडी केल्याने तो अभिजित देशमुख यांच्या रुग्णालयामागील सर्व्हिस गल्लीत घुसला. ही गल्ली दोन्ही बाजूला बंदिस्त आहे. गल्लीच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या नाल्यात गेला व या ठिकाणी तो खड्ड्यात फसला. लगेच महापालिकेच्या पथकाने त्याच्या गळ्यात तीन दोरफास अडकावून त्याला जेरबंद केले. ताकदवर असलेल्या या वळूला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या मोकाट गुरे पकडणाऱ्या पथकला मोठी कसरत करावी लागली. अखेर दुपारी ३ वाजता या वळूला जेरबंद करण्यात यश आले. वृत्त लिहिस्तोवर जखमींचे नावे कळू शकले नाही.वनविभागाची ‘गन’ धामणगावलाया वळूला पकडण्यासाठी वनविभागाला नागरिकांना कळविले. अशा प्रकारच्या आॅपरेशनमध्ये वळूला बेशुध्द करण्यासाठी टॅग मारणारी ट्रँक्युलाझर गन मात्र धामणगाव येथे रेस्कू आॅपरेशनसाठी नेली असल्याने वनविभाग कुठलिही मदत झाली नाही. ंघटनेची सूचना मिळताच रुक्मिनी नगरात ‘स्कॉड’ पाठविले. नागरिकांच्या चिथावनीमुळे हा वळू आणखी चवताळला. याविषयी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असता, गोळीने मारण्याची परवानगी मिळाली. मात्र तोवर पथकाने त्याने जेरबंद केले. त्याला अन्यत्र सोडण्यात येणार आहे. - सचिन बोंद्रे, प्रभारी पशुशल्य चिकित्सक, महापालिका.दिसताक्षणी गोळी झाडाहिंसक बनलेला वळू नागरिकांसाठी धोक्याचा आहे. त्याने ३ व्यक्तींना जखमी केले. आणखीही अनुचित घटना घडू नये, यासाइी महापालिकेचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पोलीस आयुक्त राजेशकुमार व्हटकर व फे्रजरपूरा ठाण्याचे पोलीस निरिक्षकांची भेट घेतली. परिस्थितीचे गांभीर्य निदर्शनात आल्याने पोलीस आयुक्तांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनात या वळूला बंदुकीच्या गोळीने मारण्याची परवानगी दिली. परंतु तोवर वळूला पकडण्यात आले. मोकाट गुरांना कधी घालणार आवर ?शहरात प्रत्येक चौकात, रस्त्यावर मोकाट गुरे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. रस्ता दुभाजकावर उगविलेल्या गवतावर हे गुरे चरतात. व रस्त्यावरच बैठक मांडता. या मोकाट गुरांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत आहे. ही गुरे प्रसंगी हिसंकही होतात, हे नागरिकांसाठी जिवघेणे आहे. नागरिकांच्या जिवावर उठणाऱ्या या मोकाट गुरे महापालिका केव्हा आवर घालणार हा नागरिकांचा सवाल आहे. गर्दी नियंत्रणासाठी पोलीसहिंसक असलेल्या वळूला काही मुलांनी दगड मारल्याने तो चवताळला. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. अनुचित घटना घडू नये, यासाठी फ्रेजरपूरा ठाण्याचे पोलीस शिपाई तत्काळ उपस्थित झाले होते. त्यांनी गर्दीवर नियंत्रन मिळविल्याने वळूला जेरबंद करता आल्याची माहिती महापालिकेच्या पशुवैद्यक विभागाने दिली.