लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंत्रणेला न जुमानता शेकडो टन शेणखत नाल्यात टाकण्याची बेमुर्वतखोरी आणि अनधिकृत बांधकाम करणाºया प्रशांतनगर येथील एका पशू व्यावसायिकाच्या मुसक्या आवळण्यात महापालिका प्रशासनाला अखेर यश आले. विनोद खंडारे या पशूव्यावसायिकाने केलेल्या अतिक्रमणावर ‘लोकमत’ने कटाक्ष रोखल्यानंतर मंगळवारी मेगा कारवाई करण्यात आली.अतिक्रमण निर्मूलन व पशुशल्य विभागाच्या संयुक्त कारवाईत मंगळवारी विनापरवानगी पाळलेल्या १० म्हशी जप्त करण्यात आल्या. सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत ही कावाई सुरु होती. अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त होत असताना कारवाई थांबवावी, यासाठी नगरसेवक भारत चौधरी यांनी प्रथम मध्यस्थी व नंतर वाद घातला. मात्र दबाव झुगारून संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आले. हा वाद आ.श्रीकांत देशपांडेंपर्यंत पोहोचला. दोघांनीही आयुक्त हेमंत पवार यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेतली. मात्र मनपाच्या कारवाईत लोकप्रतिनिधींनी अडसर करु नये, अशी सूचना केल्यानंतर हा वाद शमला. खंडारे यांनी पदपथावर थाटलेले ढेप विक्रीचे दुकान व अतिक्रमित गोठ्याचे बांधकाम केले.खंडारेंचे पशुपालनही अनधिकृतचप्रशांतनगर येथील विनोद खंडारे नामक या पशूपालकाने ४ सप्टेंबरला १५ म्हशी पालनासाठी महापालिकेला रितसर परवानगी मागितली होती. मात्र प्रत्यक्षात सचिन बोंद्रे यांनी स्थळनिरिक्षण केले असता तेथे १८ म्हशी आणि ५ छोट्या वगारी आढळून आल्यात. मंगळवारी अतिक्रमण आणि म्हशी जप्तीची कारवाई होत असताना गोठ्याची जागा त्यांच्या मालकीची नसल्याचे बोंद्रे यांच्या लक्षात आले. सोबतच डेअरी व्यवसायासाठी त्यांनी संबंधित विभागाची परवानगी घेतली नसल्याने कोठा आणि त्यातील २३ म्हैसवर्गीय जनावरे अनधिकृत ठरले आहेत. २३ म्हैस व वगारी पालनासाठी खंडारे यांच्याकडे पुरेशी जागा उपलब्ध नाही. ते या भागात अनधिकृतपणे पशुपालन करत असल्याने त्यांच्याकडील सर्व जनावरे जप्त करण्यात येईल, असे बोंद्रे यांनी स्पष्ट केले आहे.
प्रशांतनगरातील अनधिकृत बांधकामावर ‘बुलडोजर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:05 IST
यंत्रणेला न जुमानता शेकडो टन शेणखत नाल्यात टाकण्याची बेमुर्वतखोरी आणि अनधिकृत बांधकाम करणाºया .....
प्रशांतनगरातील अनधिकृत बांधकामावर ‘बुलडोजर’
ठळक मुद्देमहापालिकेची ‘मेगा ’कारवाई : म्हशी ताब्यात, नगरसेवकांचा अडसर