शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीने दुमदुमले वरूड

By admin | Updated: November 30, 2015 00:33 IST

शिक्षण आणि परिवर्तननिष्ठा ही मानवाच्या परिवर्तनाची महाव्दारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानली तर शिक्षणावाचून माणूस गुलाम होतो.

नामवंत साहित्यिकांची मांदियाळी : भांडवलदार, राजकारणी, धर्मांधशक्तीची अभद्र युतीवरूड : शिक्षण आणि परिवर्तननिष्ठा ही मानवाच्या परिवर्तनाची महाव्दारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानली तर शिक्षणावाचून माणूस गुलाम होतो. हे त्यांचे विचारसूत्र होते. अविद्या हे सर्व अनर्थाचे मूळ आहे. असे महात्मा जोतिबा फुले आवर्जून सांगत होते. ज्ञानानेच आत्मस्थिती व समाजस्थिती येते हे या गुरू-शिष्याने निक्षून सांगितले आहे. बदलत्या काळात भांडवलदार, राजकारणी आणि धर्मांधशक्ती यांची अभद्र युती झालेली दिसते. समाजमन गढूळ झाले आहे. जाती जाती, धर्माधर्मात विष पेरल्या जात आहे. हाच खरा लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याने बदलत्या काळात हे चित्र बदलण्याची देशाला गरज असल्याने सत्यशोधक विचारांची गरज असल्याने शनिवारी वरुडमध्ये सहावे सत्यशोधक साहित्य संमेलन सुरु झाले. या निमीत्ताने शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली.साहित्य समेंलन काठीवाले सभागृहात सुरू आहे. या परिसराला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले परिसर असे नाव देण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी काढण्यात आली. स्थानिक महात्मा फुले पुतळयाला हारार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सामाजिक चळवळीतील सेवाभावी संस्था, प्रतिष्ठीत नागरिक तसेच आ. अनिल बोंडे यांच्या हस्ते हारार्पण करण्यात येऊन ग्रांथदिंडीला सुरुवात झाली. काठीवाले सभागृहात आयोजित साहित्य संमेलनाचे उदघाटन आ. अनिल बोंडे यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी प्रख्यात विचारवंत भाऊ लोखंडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, संत गाडेगाबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुधीर पाटील, जि.प.बांधकाम सभापती गिरीष कराळे, नगराध्यक्ष रवींद्र थोरात, श्रीकृष्ण बनसोड, महात्मा फुले महादिव्यालयाचे प्राचार्य देवानंद अतकरे, माजी पोलीस उपायुक्त धनराज वंजारी, शेंदूरजनाघाटच्या नगराध्यक्षा सरिता खेरडे, ठाणेदार अर्जुन ठोसरे, आयोजन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कळमकर, वासुदेव लांडगे, साहित्यिक ज्ञानेश्वर रक्षक उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत स्वागताध्यक्ष स्त्रीरोगतज्ज्ञ मनोहर आंडे यांनी सन्मानचिन्ह आणि पुष्गुच्छ देऊन स्वागत केले.संमेलनाचे उद्घाटक आ. अनिल बोंडे यांनी भाऊसाहेब लोखंडे यांना हे संमेलन आहे राजकीय स्टेज नसलेल्यांचे, असे सांगून शाब्दिक बोलाचाल झाली. यावेळी विषयाला कलाटणी देत भाउसाहेब लोखंडे यांनी विषय सावरुन नेला. यांनी वरुडमध्ये पहिल्यांदा ६ वे सत्यशोधक साहित्य संमेलन होत असून अनेकांना संमेलनाची आतुरता लागली आहे. नामवंत साहित्यिक, विचारवंत शहरामध्ये दाखल झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)