शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभागाची जागा भंगार विक्रेत्याच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:48 IST

येथील जुने रेल्वे स्थानकासमोरील भागात रेल्वे पुलानजीकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अनेक वर्षांपासून भंगार विक्रेत्याने अतिक्रमण केले आहे. अतिशय मोक्याचा स्थळी दिवसा भंगाराचे दुकान अन् रात्री गैरकायदेशीर कामे, असा प्रताप येथे सुरू आहे. मात्र, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हा गंभीर प्रकार दिसू नये, हे आश्चर्य आहे.

ठळक मुद्देअधिकारी अनभिज्ञ : दिवसा भंगारचे दुकान अन् रात्री गैरकायदेशीर काम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील जुने रेल्वे स्थानकासमोरील भागात रेल्वे पुलानजीकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अनेक वर्षांपासून भंगार विक्रेत्याने अतिक्रमण केले आहे. अतिशय मोक्याचा स्थळी दिवसा भंगाराचे दुकान अन् रात्री गैरकायदेशीर कामे, असा प्रताप येथे सुरू आहे. मात्र, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हा गंभीर प्रकार दिसू नये, हे आश्चर्य आहे.रेल्वे पुलाजवळील बांधकाम विभागाचे कार्यालय फार जुने आहे. ही वास्तू जीर्ण झाल्याने या परिसराला अतिक्रमणाने वेढले आहे. या वास्तुकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे अतिक्रमणधारकांचे फावत आहे. सन १९६६-६७ मध्ये निर्मित रेल्वे पुलाच्या खालील भागातून रेल्वे स्टेशन ते राजापेठ दरम्यान १०० मीटर रूंदीचा वाहतुकीसाठी रस्ता आहे. त्याकाळी पादचाºयांना ये-जा करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने स्वतंत्र रस्ता होता. मात्र, आता त्यावर अतिक्रमण केले आहे. कालांतराने या वास्तुकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. ही बाब भंगार विक्रेत्याने हेरली. ती वास्तू ताब्यात घेऊन येथे भंगार दुकान थाटले. जणू ही वास्तू आपल्या मालकीची असल्यागत या भंगार दुकानदाराने जागेवर ताब्यात मिळविला.रेल्वे स्थानकाजवळ भंगार दुकान कशासाठी?रेल्वे स्थानकाजवळ भंगार दुकान थाटण्यामागे बरेच काही दडले आहे. यापूर्वी रेल्वे स्थानक निर्मितीचे कामे सुरू असताना मोठ्या प्रमाणात लोखंडी साहित्य, रेल्वे रूळ चोरीच्या घटना घडल्या आहेत. असे असताना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना हाकेच्या अंतरावर थाटण्यात आलेल्या भंगार दुकानाबाबत संशय येऊ नये, हा संशोधनाचा विषय आहे.घटनास्थळी भेट देऊन वास्तूची पाहणी केली जाईल. या जागेवर विधायक कामे हाती घेण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेऊ. येथे बांधकाम विभागाचे जुने सेक्शन इंजिनीअरिंगचे कार्यालय असल्याची नोंद आहे. लवकरच ही वास्तू ताब्यात घेतली जाईल.- सदानंद शेळके, कार्यकारी अभियंतासार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती