शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अंदाजपत्रकाची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:11 IST

महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, प्रशासनासमोर उत्पन्न खर्चाचे मेळ साधण्याचे आव्हान राहणार आहे.

ठळक मुद्देवेध अर्थसंकल्पाचे : वस्तुनिष्ठतेवर भर

आॅनलाईन लोकमतअमरावती : महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, प्रशासनासमोर उत्पन्न खर्चाचे मेळ साधण्याचे आव्हान राहणार आहे.उत्पन्न कमी आणि खर्च अधिक झाल्याचे दृश्य परिणाम या अंदाजपत्रकावर जाणवण्याची शक्यता असून स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात गेल्या वर्षीपेक्षा वाढ होणार काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी ७४०.८३ कोटींचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्तांच्या वतीने स्थायी समितीसमोर मांडण्यात आले होते. या अंदाजपत्रकात ३४१.५० कोटी महसूल उत्पन्न, ३७६.८४ कोटी भांडवली उत्पन्न आणि २१.४९ कोटी असाधारण ऋण दाखविण्यात आले होते. यात आयुक्तांनी मांडलेला ४० टक्के दरवाढीचा प्रस्ताव स्थायीने अमान्य केल्या व काही सुधारणा सुचविल्या. त्यानंतर ७७७.२६ कोटींच्या अर्थसंकल्पास सभागृहाने शिक्कामोर्तब केले. मालमत्ताकरातून ४५ कोटी अपेक्षित धरण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मार्च अखेरीस मालमत्ता करातून अवघे ३० कोटी रुपये येणेच अपेक्षित आहे. मालमत्ता मुल्यांकन व करनिर्धारण प्रकल्प राबविल्यास मालमत्ता कर १०० कोटींवर नेण्याचा संकल्प करण्यात आला. मात्र तो मार्च अखेरीसही पूर्णत्वास न आल्याने अर्थसंकल्पीय तरतुदींचा बोऱ्या वाजला आहे.वास्तवदर्शितेचे आव्हानउत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ न बसल्याने विपरित परिस्थिती येऊन ठेपली आहे. महापालिकेच्या दायित्वामध्ये गतवर्षीपेक्षा मोठी वाढ झाली आहे. कंत्राटदारांचे देयक रखडली आहेत. या पार्श्वभूमिवर हे अंदाजपत्रक वास्तवदर्शी करण्याचे आव्हान स्थायी व प्रशासनासमोर असेल.