शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा अर्थसंकल्प आज स्थायी समितीसमोर

By admin | Updated: March 21, 2016 00:14 IST

महापालिकेचा सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचा प्रारूप आराखडा सोमवार २१ मार्चला स्थायी समितीसमोर मांडला जाणार आहे.

मार्डीकरांसमोर आव्हान : नवे कर नाहीतअमरावती : महापालिकेचा सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचा प्रारूप आराखडा सोमवार २१ मार्चला स्थायी समितीसमोर मांडला जाणार आहे. स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर हे अन्य सदस्यांसह या अर्थ संकल्पावर खल करणार आहेत. महापालिका आयुक्तांनी यंदाचा अर्थ संकल्प सुमारे ८०० कोटी रुपयांचा असल्याचे संकेत दिले आहे. काही सुधारणा सुचविण्यासाठी आयुक्तांकडून आलेला आराखडा स्थायी समितीसमोर मांडल्या जातो. स्थायी समितीने शिक्कामोर्तब केल्यानंतर तो आमसभेत ठेवल्या जातो. महापालिकेचे मर्यादित आर्थिक स्त्रोत पाहता वस्तुनिष्ठ अर्थ संकल्प सादर करण्याचे प्रशासन आणि स्थायी समितीसमोर आव्हान आहे. सुमारे ७ लाख लोकसंख्येच्या अमरावती शहराला अद्यापही मुलभुत सुविधाची गरज आहे. त्या पुर्ण करण्याकडे पालिकेचा भर असायला हवा, ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन मर्यादित उत्पन्नामध्ये आणि कुठलीही करवाढ न करता आर्थिक ताळेबंद जुळविण्याचे प्रयत्न यंत्रणेला करावयाचा आहे. स्थानिक संस्था कर प्रणाली अस्तिवात नसल्याने महापालिकेचे उत्पन्न मर्यादित झाल्याने पालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे. आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना नवे आर्थिक स्त्रोत शोधण्याचे धनुष्य पालिकेच्या यंत्रणेसह नगरसेवक पदाधिकाऱ्यांनाही पेलावे लागणार आहे. (प्रतिनिधी)वस्तुनिष्ठतेवर भर-मार्डीकरमहापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहून वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प सादर केला जाईल, मर्यादित उत्पन्नावर शहराला कशी दिशा देता येईल, यावर भर दिला जाणार आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने नगरसेवकांना लवकरात लवकर निधी देण्याकडे स्थायी समितीचा कल आहे. उत्पन्न वाढीसाठी नागरिकांना विश्वासात घेऊन प्रयत्न करणार आहोत, रस्ते, नाल्या, पेयजल, पार्किंग या समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्नरत आहोत, अशी प्रतिक्रीया स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर यांनी दिली.