शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘टॅक्स टेररिझम’कडे नेणारे बजेट : यशोमती ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 05:00 IST

मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, शब्दांची-आकड्यांची आतषबाजीशिवाय काहीच नाही. जेंडर बजेट बनवण्यातही हे सरकार अपयशी ठरले आहे. महिला-बाल कल्याणच्या सध्या सुरू असलेल्या चार योजनांची नावे भाषणात घेतली तरी अर्थमंत्र्यांनी महिला वर्गाची घोर निराशा केली आहे. पगारदार मध्यम वर्गाला आयकरात सूट मिळाली नाही. कोविडकाळात पगारदार तसंच इतर घटकांवर आर्थिक संकट कोसळले. मात्र, हा अर्थसंकल्प अशा घटकांना दिलासा देण्यात कमी पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  केंद्रीय अर्थसंकल्पातून देशाला मोठी आशा होती. दुर्दैवाने ‘टॅक्स टेररिझम’कडे नेणारे हे बजेट आहे. कोविडनंतर सामान्यांना दिलासा देण्याची मोठी संधी मोदी सरकारने मंगळवारी सादर झालेल्या गमावल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, शब्दांची-आकड्यांची आतषबाजीशिवाय काहीच नाही. जेंडर बजेट बनवण्यातही हे सरकार अपयशी ठरले आहे. महिला-बाल कल्याणच्या सध्या सुरू असलेल्या चार योजनांची नावे भाषणात घेतली तरी अर्थमंत्र्यांनी महिला वर्गाची घोर निराशा केली आहे. पगारदार मध्यम वर्गाला आयकरात सूट मिळाली नाही. कोविडकाळात पगारदार तसंच इतर घटकांवर आर्थिक संकट कोसळले. मात्र, हा अर्थसंकल्प अशा घटकांना दिलासा देण्यात कमी पडला आहे. संसदेत क्रिप्टोकरन्सीबाबतही बिल न आणता मागच्या दाराने त्याला मान्यता देण्यात आलेली दिसत आहे. मात्र, त्याचवेळी डिजिटल असेटवरील व्यवहारांवर ३० टक्के कर आणि एक टक्के ट्रॅन्झेक्शन टॅक्स लावून आणखी गोंधळ उडवून दिला. एकीकडे देशातील बहुसंख्याक जनतेचे उत्पन्न घटले. सरकार मात्र विक्रमी करवसुली करीत आहे. जीएसटीची विक्रमी करवसुली असो किंवा सरकारचे वाढलेले उत्पन्न, आपण लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून टॅक्स टेररिझमकडे जातोय का, याच्या परीक्षणाची वेळ आल्याचे वाटतेय. कोविडनंतर सामान्य भारतीयांना दिलासा देण्याची मोठी संधी या सरकारने गमावली आहे, असे त्या म्हणाल्या.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर