शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात घोडचूक, कॅफो, आॅडिटरला शोकॉज

By admin | Updated: June 11, 2017 00:04 IST

महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात महिला व बालकल्याण विकासासाठी राखीव तरतूद करणे अनिवार्य असताना ती न ठेवण्याची घोडचूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे.

लाभार्थी वंचित : एकतर्फी कारवाईचा इशारा, महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात महिला व बालकल्याण विकासासाठी राखीव तरतूद करणे अनिवार्य असताना ती न ठेवण्याची घोडचूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड व मुख्य लेखापरीक्षक प्रिया तेलकुंटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आयुक्त हेमंत पवार यांच्या स्वाक्षरीने या नोटीस उभय वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करण्याची जबाबदारी मुख्य लेखाधिकाऱ्यांकडे आहे. त्यानुसार सन २०१५-१६, २०१६-१७ व २०१७-१८ या आर्थिक वर्षातील महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करताना महिला व बालकल्याण विकासासाठी ५ टक्के राखीव तरतूद करणे आवश्यक आहे. त्या संदर्भात नगरविकास विभागाने १४ जुलै १९९३ च्या शासन निर्णयान्वये चौकट ठरवून दिली आहे. असे असताना प्रेमदास राठोड यांनी उक्त तीन आर्थिक वर्षात तरतूद केली नाही. त्यामुळे शासन धोरणानुसार महिला व बालकल्याण विकासासाठी खर्च करता आला नाही, असा ठपका राठोड यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकारामुळे अर्थसंकल्पातील घोडचूक प्रथमत:च जगजाहीर झाली आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ (१) (२) (३) चे उल्लंघन असल्याचे आयुक्त हेमंत पवार यांनी म्हटले आहे. यापूर्वीही अर्थसंकल्पाच्या विश्वसनियतेसह अन्य बाबींवर लेखापरीक्षकांनी गंभीर ताशेरे ओढले आहेत. कॅफो आणि आॅडिटर यांना पाठविलेल्या "शो कॉज"चे उत्तर आल्यानंतर या घोडचुकीला जबाबदार कोण, हे स्पष्ट होईल.प्रिया तेलकुंटेवर ठपकायाप्रकरणी महापालिकेच्या मुख्यलेखापरिक्षक प्रिया तेलकुंटे यांच्या कार्यप्रणालीवरही ठपका ठेवण्यात आला आहे. महापालिकेतील विभागामार्फत सादर करण्यात येणाऱ्या सर्व नस्त्यांचे लेखापरिक्षण करण्याची जबाबदारी तेलकुंटे यांच्यावर आहे. महिला व बालकल्याण विकासासाठी तीन आर्थिक वर्षात तरतूद केल्या गेली नाही. त्यावर आक्षेप नोंदविणे आवश्यक असताना तो न नोंदविल्यामुळे शासन धोरणानुसार खर्च करता आला नाही, असा ठपका तेलकुंटे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.-तर एकतर्फी प्रशासकीय कारवाईयासंबंधी विहित मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास प्रशासनाकडून योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असेही कारणे दाखवा नोटीसमध्ये आयुक्तांकडून उभय अधिकाऱ्यांना बजावण्यात आले आहे.अर्थसंकल्पात ५ टक्के निधी राखीव न ठेवल्या संबंधी आक्षेप न घेतल्याबाबत आणि तो निधी राखीव न ठेवल्याबाबत कॅफो आणि आॅडिटरला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.- हेमंत पवार, आयुक्त, महापालिका