शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकीय दवाखान्यात कूपनलिका अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:04 IST

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील पशुवैद्यकीय दवाखान्यांची नवीन इमारत बांधकाम करताना पशुधनाला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी यापुढे अंदाजपत्रकातच कूपनलिका अनिवार्य करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : पशुसंवर्धन समिती सभेत ठराव पारित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील पशुवैद्यकीय दवाखान्यांची नवीन इमारत बांधकाम करताना पशुधनाला पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी यापुढे अंदाजपत्रकातच कूपनलिका अनिवार्य करण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीने ठराव घेतला.पशुसंवर्धन समितीची सभा विविध विषयांनी अनुसरून १० नोव्हेंबर रोजी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांच्या दालनात पार पडली. समिती सदस्य शरद मोहोड यांनी प्रस्ताव मांडला. त्याला उपाध्यक्ष तथा सभापती दत्ता ढोमणे यांनी एकमताने मंजुरी दिली. नॅशनल डेअरी बोर्ड व राज्य शासनामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मदर दूध संकलन केंद्रे सध्या सहा तालुक्यांतील २४० गावांमध्ये सुरू आहेत. याशिवाय येत्या जानेवारीपासून मेळघाटातील धारणी, चिखलदरा व अचलपूर तालुक्यातही मदर दूध डेअरी संकलन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे यांनी दिली. राजे यशवंतराव होळकर महामेष योजना अहल्यादेवी होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळ राबविणार आहे. पात्र लाभार्थींनी १५ नोव्हेंबरपर्यंत जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे आॅनलाइन अर्ज करावे, असे आवाहन ढोमणे व रहाटे यांनी केले. निवडीसाठी पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या नेतृत्वातील समिती राहणार आहे. यावेळी इतरही मुद्द्यांवर सदस्य शरद मोहोड, सुखदेव पवार यांनी चर्चा केली. रहाटे यांनी प्रशासनाच्या कारवाईबाबत माहिती देऊन सदस्यांचे समाधान केले. सभेला समिती सदस्य प्रियंका दाळू, छबूबाई जाधव, सुखदेव पवार, सचिन पाटील, शरद मोहोड, पशुसंर्वधन अधिकारी तांत्रिक मिलिंद काळे व तालुका पशुसंवर्धन अधिकारी उपस्थित होते.सहा ठिकाणी पशुधन मेळावेजिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्यावतीने यंदाही सहा गावांमध्ये भरणाºया यात्रा महोत्सवात पशुसंर्धन मेळावे घेतले जाणार आहेत. यात बहिरम, टिटंबा, सालबर्डी, ऋणमोचन, वाढोणा रामनाथ, तळेगाव दशासर आदी गावांचा समावेश आहे.