शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

'बीटी' लढणार नसल्यानेच मी मैदानात !

By admin | Updated: February 9, 2016 00:07 IST

''लोकप्रतिनिधी या नात्याने कार्याशी कमालीचे निष्ठावान असलेल्या वऱ्हाडवैभव बी.टी. देशमुखांप्रतिच्या आदरामुळेच मी नेहमी शांत राहिलो. यावेळी 'बीटीं'ची अनुमती मिळाली.

 संजय खोडके : गूढ उकलले, यापूर्वीही होती इच्छा नि तयारी!गणेश देशमुख अमरावती''लोकप्रतिनिधी या नात्याने कार्याशी कमालीचे निष्ठावान असलेल्या वऱ्हाडवैभव बी.टी. देशमुखांप्रतिच्या आदरामुळेच मी नेहमी शांत राहिलो. यावेळी 'बीटीं'ची अनुमती मिळाली. त्यांनी आशीर्वाद दिल्यामुळेच पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला,'' पदवीधर मतदारसंघातून संजय खोडके हे निवडणूक लढविणार की कसे, यासंबंधी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उत्कंठापूर्ण चर्चेला खुद्द खोडके यांनीच पूर्णविराम दिला. 'लोकमत'ला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान या मुद्यावर त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. राजकारणात सक्रिय झाल्यापासून आजतागायत 'किंग मेंकर'च्याच भूमिकेत वावरणारे संजय खोडके हे त्यांच्याच आयोजनाच्या मंचांवरदेखील कधी शोधून सापडले नाहीत. प्रसिद्धी, फोटो, फ्लेक्स यापासूनही ते कटाक्षाने दूर राहिलेत. त्यांच्या अर्धांगिणी सुलभा खोडके या बडनेरा मतदारसंघाच्या आमदार होत्या. महापालिका राजकारणातील खोडकेंच्या नेतृत्त्वाचा प्रभाव निर्विवाद आहे. गृहराज्यमंत्र्यांचा मतदारसंघराज्याचे गृहराज्यमंत्री असलेले रणजित पाटील हे पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम आणि बुलडाणा या पाच जिल्ह््यांमध्ये विस्तारलेल्या या औरसचौरस मतदारसंघात वर्षभराने निवडणूक होऊ घातली आहे. रणजित पाटलांबाबतची नकारात्मक 'वेव्ह' आणि त्यातही गृहजिल्ह्यातून स्वपक्षीय आणि स्वकीयांकडूनच होत असलेला जाहीर विरोध हेदेखील या निवडणुकीसंबंधी उत्सुकता निर्माण करण्याचे एक कारण होय. खोडके यांना राष्ट्रवादी सोडावी लागल्यानंतर त्यांनी वऱ्हाड विचार मंच स्थापन केला. मूळ बैठक काँग्रेस विचारसरणीचीच असल्यामुळे त्यांनी नंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काही महिन्यांपासून खोडके निवडणूक लढणार, अशी चर्चा मतदारसंघात असली तरी दुजोराच मिळेना! सोमवारी हे गूढ उकलले. त्यातील अनेक कंगोरे स्पष्ट झालेत. ''बीटी देशमुख हे माझा आदर्श आहेत. त्यांच्याइतका प्रामाणिक लोकप्रतिनिधी मी बघितला नाही. यापूर्वीदेखील पदवीधर मतदारसंघातून लढण्याची माझी इच्छा आणि तयारी होती; तथापि बीटी उभे राहणार असतील तर त्यांच्यासारख्या व्यक्तीला विरोध करण्याचा मी विचारही करू शकणार नव्हतो. त्यामुळेच मी ना कधी उमेदवारी घोषित केली, ना तसे कधी संकेत दिलेत. अलिकडेच मी बीटींना भेटायला गेलो होतो. वारंवार विचारल्यावर, 'मी निवडणूक लढणार नाही, ही काळ्या दगडावरील रेघ आहे' अशा शब्दांत त्यांनी त्यांचा निर्णय सांगितला. मी माझी तयारी दर्शविली. त्यांची अनुमती आणि आशीर्वाद मिळाले. केवळ बीटी लढणार नाहीत एवढ्याचसाठी मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, अशी भूमिका खोडके यांनी व्यक्त केली.